Home ताज्या बातम्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचा कार्यभार सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे...

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचा कार्यभार सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्याकडे

0
6

जामखेड न्युज—–

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचा कार्यभार सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्याकडे

कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी जामखेड सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्याकडे सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नविन सचिवाकडून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड, जि. अहिल्यानगर मासिक सभा दि.३०/०३/२०२६ मधील ठराव क्र.७ व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील दि.०१/०४/२०२६ चे पत्र जोडून पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाने दि.१६/४/२०२६ च्या पत्रान्वयेमहाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विननियमन)

अधिनियम, १९६३ चे कलम ३५ (अ) मध्ये काहीही अंतर्भुत असले तरी, राज्य शासनास सहकार विभागातील (सहकार अधिकारी श्रेणी दोन) या पदाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या पदावर नसेल अशा कोणत्याही अधिकाऱ्यास कोणत्याही बाजार समितीचा सचिव नियुक्त करता येईल, अशी कायदेशीर तरतूद आहे.

सदर तरतूदीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गट-ब या दर्जाचे अधिकाऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड, जि. अहिल्यानगर या ठिकाणी सचिव पदाचा अतिरिक्त पदभार देणेबाबत प्रस्ताव अनुषंगीक कागद पत्रांसह या कार्यालयास सादर केला आहे.

उपरोक्त नमूद बाबी विचारात घेता कार्यालयीन कामकाज व प्रशासकीय सोइच्या दृष्टिने सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड, जि. अहिल्यानगर या पदाचा अतिरिक्त पदभार श्री. दिलीप रंगनाथ तिजोरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड, जि. अहिल्यानगर यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद अधिकारी यांनी सदर आदेशाप्रमाणे उचित कार्यवाही करावी व तसा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.असे पत्रात म्हटले आहे.

चौकट
सहाय्यक निबंधक यांच्या कडे अतिरिक्त पदभार असताना कृषी उत्पन्न बाजार समिती कोट्यवधी रुपये नफ्यात येथे. मग इतर सचिवांना हे का साध्य होत नाही. अशीच चर्चा सुरू आहे. आता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय नवीन सचिव घेतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!