Home ताज्या बातम्या आकाश दरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड सोमवारी भव्य मिरवणूक व...

आकाश दरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड सोमवारी भव्य मिरवणूक व नागरी सत्कार

0
3

जामखेड न्युज—–

आकाश दरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

सोमवारी भव्य मिरवणूक व नागरी सत्कार

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथील आकाश दरे हे २०१७ मध्ये स्पेशल फोर्स कमांडो नवी मुंबई येथे पोलीस दलात भरती झाला. खडतर कमांडो प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केले, अंगी जिद्द चिकाटी असल्यामुळे नुकततीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यामुळे साकत कोल्हेवाडी, यासह नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

आकाश दरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी ४ मे रोजी भव्य नागरी सत्कार व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकाशचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर पाचवी ते दहावी श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शिक्षण झाले. अकरावी बारावी सायन्स ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेज यानंतर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई येथे पदवीचे शिक्षण पुर्ण केले.


आकाश दरे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक रोल मॉडेल म्हणून आहेत. अंगी जिद्द चिकाटी असेल तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो.

आकाश दरे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र विदर्भ अकोला येथे महाराष्ट्र पोलीसचे 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण पुर्ण, तसेच NSG च्या धर्तीवर इस्रायल टॅक्टिस कमांडो ट्रेनिंग srpf गट 1 पुणे येथे 2 महिन्याचे खडतर कमांडो प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले.

कमांडो हिट compitition मध्ये All over best 2023 फोर्स वन गोरेगाव मुंबई येथे झालेल्या कॉम्पिटीशन मध्ये टॉप आले.

महाराष्ट्र पोलीस 10 किमी फिट इंडिया सायकलिंग स्पर्धा अवघ्या 21 मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला.. अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. आता त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!