Monday, April 27, 2026
Home ताज्या बातम्या आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्या व बागेश्वर महाराजावर गुन्हा दाखल करा...

आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्या व बागेश्वर महाराजावर गुन्हा दाखल करा – ॲड. डॉ. अरुण जाधव वंचितच्या वतीने शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे केले वाचन

0
2

जामखेड न्युज—–

आमदार संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्या व बागेश्वर महाराजावर गुन्हा दाखल करा – ॲड. डॉ. अरुण जाधव

वंचितच्या वतीने शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे केले वाचन

 

वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्ष जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने सोमवार दि २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ॲड. डॉ. अरुण आबा जाधव वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते व संगीता भालेराव नगरसेविका वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे जामखेड तहसील कार्यालयासमोर सामूहिक वाचन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड व बागेश्वर महाराज यांनी जे अपशब्द वापरले त्याबद्दल निषेध करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड अरुण जाधव म्हणाले की शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राजीनामा दिला पाहिजे व बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे राजांबद्दल कुणी काही बोलले तर आम्ही गप्प बसणार नाही.

आम्ही अठरापगड अलुतेदार बलुतेदार, भटके, ओबीसी, आदिवासी व मुस्लिम यांचे राजे आहेत. शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे शिवप्रेमी गप्प का ? नुसतं मतदान करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी राजे आपल्याला दिसतात का? राजकारणी लोक फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात, समुद्रात शिवस्मारक बांधायचे होते मग अजुन का बांधले नाही.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाजी डोके यांनी सांगितले की बागेश्वर महाराज व शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले आहे त्यामुळे बागेश्वर महाराजांवर गुन्हा तर आ. संजय गायकवाड यांचा सरकारने राजीनामा घेतला पाहिजे. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा सरकार मधिल कोणीच काही बोलत नाही यावरुन त्यांचा या केलेल्या बेताल वक्तव्यास पाठींबा आहे का? संपुर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी यांनी देखील या घटनेचा निषेध केला पाहिजे.

यावेळी बापू ओहोळ, शहाजी डोके, रजनी बागवान, संगीत भालेराव व उर्मिला कवडे यांनी पुस्तकाचे वाचन केले. यावेळी सुमित भालेराव, विशाल पवार, अंकल घायतडक, अनिल सदाफुले, विकी कांबळे, सुशील राजगुरू, पप्पू भालेराव, अशोक आव्हाड, ऋषिकेश गायकवाड, रामेश्वर काळे व अश्विनी संतोष चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!