जामखेड न्युज—–
श्री साकेश्वर यात्रेची कावड मिरवणुकीने मोठ्या उत्साहात सुरूवात, मंगळवारी जंगी हगामा तर बुधवारी बैलगाडा शर्यतीचा थरार
जामखेड तालुक्यातील साकत येथे आज सोमवार दि. ६ रोजी श्री साकेश्वर यात्रेला सकाळी कावड मिरवणूक, लेझीम, ढोल ताशा व डीजेसह मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. गोदावरी नदीचे राक्षसभुवन शनीचे येथून आणलेले पवित्र जल याने देवाचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शेरणी वाटप तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री बारा वाजता देवाची पालखी मिरवणूक असते. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी असलेले तसेच नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने गावी येतात यामुळे तीन दिवस गावात मोठी गजबज असते.

यात्रेनिमित्त दि. ७ रोजी मंगळवारी दुपारी जंगी हगामा निमित्ताने प्रथम क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने विरूद्ध महाराष्ट्र चँपियन पै. गणेश जगताप यांच्यात होईल, दुसऱ्या क्रमांकाची इंटरनॅशनल चँपियन पै.संजय तनपुरे विरुद्ध पै. ऋषी काळे तसेच इंटरनॅशनल चँपियन पै. संदिप लटके विरुद्ध विरुद्ध पै. धुळाजी ईटकर, तिसऱ्या क्रमांकाची पै पृथ्वीराज वनवे विरुद्ध पै. मनोज पवार तसेच पै सौरभ गाडे विरुद्ध संकेत हजारे तसेच विशेष कुस्ती पै. देवा थापा नेपाळ विरुद्ध नवीन चव्हाण हिमाचल यांच्या कुस्ती चे विशेष आकर्षण असेल.

कुस्ती हगाम्यासाठी पंच म्हणून पै. बाळासाहेब आवारे, पै. बापू जरे, पै. शरद कार्ले, पै. बालाजी जरे, पै. श्रीधर मुळे, पै. विठ्ठल देवकाते, पै. वसंत रसाळ, पै. सचिन दाताळ, पै. आलेश जगदाळे, पै. भारत शिंदे, पै. मारूती गाडे, पै. मोहन पवार, पै. शकिल शेख, पै. मोहन अडसूळ, पै. सुरेश मुरूमकर, पै. डांबे मामा तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर टिप नवीन कुस्त्या जोडल्या जाणार नाहीत, पंचाचा निर्णय अंतिम राहिल.

तिसऱ्या दिवशी बुधवारी भव्य दिव्य श्री साकेश्वर केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम व दोन पैठणी बक्षीस मिळेल एक दुसा व एक बैल अशी असेल प्रथम क्रमांक सौजन्य अनिल वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर, द्वितीय क्रमांक सौजन्य राजू वराट उपसरपंच तसेच ऋषी पाटील यांचे असेऊ. तृतीय क्रमांक सौजन्य सरपंच सागर कोल्हे, चौथा क्रमांक अविन लहाने व युवराज वराट, पाचवा क्रमांक प्रदिप लहाने, सहावा दादासाहेब मोहिते, सातवा दत्तात्रय वराट, आठवा क्रमांक अमोल वराट यांचे सौजन्य राहिल तर पैठणी सौजन्य सुरेश वराट व महेश सांळुके यांचे आहे.






