Home ताज्या बातम्या अपघातातील जखमी ड्रायव्हरचा मृत्यू

अपघातातील जखमी ड्रायव्हरचा मृत्यू

0
5

जामखेड न्युज—–

अपघातातील जखमी ड्रायव्हरचा मृत्यू

२९ मार्च रोजी अकलूज येथे विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना जामखेड जवळ झालेल्या अपघातातील वाहन चालक अशोक बाळासाहेब कोल्हे याचा अहिल्यानगर येथिल हॉस्पिटलमध्ये दोन दिवसानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या आपघातात चारचाकी वाहन पलटी होऊन वाहन चालकासह एकुण आठ जण जखमी झाले होते. यातील काहींना किरकोळ दुखापत झाली होती. तर काहींचे हात पाय फँक्चर झाले होते. यातील काही जण अहिल्यानगर येथिल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते तर काही जामखेड येथे उपचार घेत होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि २९ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजता चारचाकी गाडीचा चालक अशोक बाळासाहेब कोल्हे रा. चिंचपूर, ता.आष्टी, जिल्हा बीड. हा गाडीचे भाडे घेऊन जामखेड येथील श्रेयश प्रल्हाद राजगुरू, चैतन्य भक्तराज राजगुरू, ओम महेंद्र राऊत, सौरभ बबन यवले, साहिल अंबिका जाधव, यश संतोष खेत्रे, अमिन शेख यांना घेऊन अकलुज येथे वॉटर पार्कला चालला होता.

त्यांची गाडी शहरापासून तीन कमी अंतरावरील जामखेड कर्जत रोडवरील रत्नदीप मेडीकल कॉलेज जवळ आले असताना वळणावर अंदाज न आल्याने
अचानक या वहानाने दोन ते पलटी मारल्या.

या चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात चालकासह एकुण आठ जण जखमी झाले होते. यातील श्रेयस प्रल्हाद राजगुरू रा. जामखेड व गाडीचा चालकआशोक बाळासाहेब कोल्हे रा. चिंचपूर, ता. आष्टी जिल्हा. बीड हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर या ठिकाणी हलवण्यात आले होते.

तर उर्वरित जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील काहीही घरी सोडण्यात आले तर काहींवर उपचार सुरू आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!