Monday, April 6, 2026
Home ताज्या बातम्या टापटीपपणा हा विजय हराळे यांचा विशेष गुण – शशिकांत देशमुख लिपिक...

टापटीपपणा हा विजय हराळे यांचा विशेष गुण – शशिकांत देशमुख लिपिक हा कार्यालयाचा कणा – श्रीकांत होशिंग विजय हराळे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

0
37

जामखेड न्युज—–

टापटीपपणा हा विजय हराळे यांचा विशेष गुण – शशिकांत देशमुख

लिपिक हा कार्यालयाचा कणा – श्रीकांत होशिंग

विजय हराळे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न


विजय हराळे हे केवळ लिपिक नव्हते, तर ते या कार्यालयाचा कणा होते. त्यांच्या कामातील शिस्त, सुंदर हस्ताक्षर, फाईलची क्रमवार मांडणी आणि नागरिकांशी नम्रपणे संवाद साधण्याची त्यांची पद्धत नवीन कर्मचाऱ्यांसाठी शिकण्यासारखी आहे. असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

श्री साकेश्वर विद्यालयातील लिपिक विजय हराळे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा अतिशय उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. 26 वर्षापेक्षा जास्त सेवा करत ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत यानिमित्ताने त्यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरूणशेठ चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, अनंता खेत्रे, श्रीराम मुरूमकर, रमेश अडसूळ, माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास वराट, ज्ञानाभाऊ मुरूमकर, हरीभाऊ बेलेकर, शिवप्रसाद झगडे, संजय गदादे, आंबेकर भाऊसाहेब, ईश्वर कोळी, दत्तात्रय राजमाने, सरपंच कांतीलाल वराट, महादेव मुरूमकर, रोहित घोडेस्वार, माधव हराळे, राजेंद्र हराळे, रमेश गिरमे, रघुनाथ हराळे,
आजीनाथ निमोणकर, दशरथ निमोणकर, रामचंद्र होशिंग भाऊसाहेब, बबन राठोड, पोपट जगदाळे, बाबासाहेब धनवडे, संतोष देशमुख, किशोर कुलकर्णी, अशोक घोलप तसेच श्री साकेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक भरत लहाने, शिक्षक सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक सहकारी, नातेवाईक, मित्रमंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भरत लहाने यांनी केले. याप्रसंगी बोलताना माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी विजय हराळे यांच्या शिस्तप्रिय कामाची, प्रामाणिकपणाची आणि कार्यालयातील योगदानाची प्रशंसा केली. लिपिक हे कार्यालयाचा कणा असतात, हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले, असे गौरवोद्गार काढण्यात आले.

यावेळी माधव हराळे, संजय वराट, कैलास वराट, श्रीराम मुरूमकर, ज्ञानाभाऊ मुरूमकर, सुदाम वराट, मुलगा महेश हराळे यांनी हराळे यांच्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विजय हराळे म्हणाले की, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शन यामुळेच आपण यशस्वी सेवा बजावू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या प्रसंगी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्री साकेश्वर विद्यालयाच्या वतीने हराळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मित्र परिवार, सहकारी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट व अर्जुन रासकर यांनी तर तर आभार प्रदर्शन त्रिंबक लोळगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!