जामखेड न्युज—–
जामखेड तालुक्यातील हाॅटेल चालकाच्या आत्महत्या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या मॅनेजर वर गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील हाॅटेल चालकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना दि.२७ रोजी घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी अशोक जाधव यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. यानुसार फायनान्स कंपनीच्या मॅनेजर विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांनी शेतकऱ्यांकडून वसुली केलेले पैसे मॅनेजर बोरकर यांना भरण्यासाठी दिले तरीही बोरकर यांनी ते कंपनीकडे जमा केले नाहीत. ते पैसे जाधव यांच्या नावेच राहिले तसेच काही पैसे जाधव यांना परत भरायला लावले होते. यातून जाधव कर्जबाजारी झाले. यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. असे मयत जाधव यांची पत्नी सुषमा यांची म्हटले आहे.

मयत अशोक जाधव यांची पत्नी सुषमा अशोक जाधव वय-37 वर्षे धंदा- शेती रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे मयत पती अशोक बाबासाहेब जाधव यांचे पिंपरखेड ता. जामखेड येथे साईराज चायनिज सेंटरनावाचे हॉटेल असुन ते चालवुन आम्ही आमचे कुटुंबाचा उदरर्निवाह करतो. दि.27.03.2026 रोजी पती अशोक बाबासाहेब जाधव वय-45 वर्षे हे सकाळी 06.00 वा चे सुमारास नेहमी प्रमाणे हॉटेलवर साफसफाई करण्यासाठी गेले होते. ते बराच वेळ झाले तरी परत न आल्याने मुलगी सृष्टी हि त्यांना बोलावण्यासाठी हॉटेलवर गेली असता पती अशोक बाबासाहेब जाधव यांनी आमचे हॉटेलचे पत्राचे अँगलला दोरीच्या सहयाने गळफास घेतलेला दिसले.

त्यांनतर मुलगी सृष्टी ही घरी आली व तीने मला सदरचा प्रकार सांगितला त्यांनतर मी तसेच आमचे इतर नातेवाईक असे आम्ही आमचे हॉटेलवर गेलो असता पती अशोक बाबासाहेब जाधव यांनी पत्र्याचे अँगलला गळफास घेतलेला होता. त्यानंतर मी तसेच आमचे इतर नातेवाईक असे आम्ही पती अशोक बाबासाहेब जाधव यांना खाली उतरुन घेतले.

त्यानंतर खाजगी अँम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपचारकामी दाखल केले असता तेथील डॉक्टर यांनी त्यांना तपासुन ते मयत असल्याचे सांगितले त्यांनतर दिर धर्मेंद्र जाधव यांनी पती यांचे मयता बाबत जामखेड पोलीस स्टेशन येथे खबर दिली त्यांनतर पोलीसांनी त्यांचे प्रेतावर पंचनामा केला त्यानंतर ग्रामीण रुग्णालय जामखेड येथील डॉक्टरांनी त्यांचेवर पोस्टमार्टमकरुन त्यांचे प्रेत पुढील विधीसाठी आमचे ताब्यात दिले नंतर आम्ही त्यांचे प्रेतावर आमचे मुळ गावी पिंपरखेड ता.जामखेड येथे अत्यविधी केला. असुन मयत पती अशोक बाबासाहेब जाधव यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम झाले नंतर तक्रार देण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, अशोक बाबासाहेब जाधव वय 45 वर्षे रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हे सन 2019 पासून सन 2022 पर्यंत अदानी कॅपिटल फायनस कंपनी अहिल्यानगर या कंपनी मध्ये रिकव्हरी(वसुली करण्याचे काम करत होते. मुकुंद बोरकर हे त्यांचे कंपनीत मॅनेजर होते. माझे पती अशोक बाबासाहेब जाधव यांचेकडे कर्जत, जामखेड, पाथर्डी, आष्टी या तालुक्यातील वसुली करण्याचे काम करत होते.

माझे पती अशोक यांनी वसुली केले नंतर ते त्यांचे मॅनेजर मुकुंद बोरकर यांना आमचे गावी पिंपरखेड ता. जामखेड येथे बोलावुन घेवुन वसुलीचे कामाचे जमा झालेले पैसे पुढे भरण्यासाठी देत असत त्यांनतर मुकुंद बोरकर हे पैसे घेवुन अहिल्यानगर येथे निघुन जात असत. बरेच शेतकरी आमचे घरी येवुन पती अशोक बाबासाहेब यांना पैशाची मागणी करत असत त्यामुळे मी पती अशोक यांना तुम्हाला बाहेरचे लोक येवुन पैसे का मागत आहेत. असे विचारले असता त्यांनी मला सांगितले होते की, मी शेतक-या कडुन वसुलीचे जमा झालेले पैसे आमचे कंपनीचे मॅनेजर मुकुंद बोरकर यांचे कडे पुढे भरण्यासाठी देत होतो. परंतु मॅनेजर मुकुंद बोरकर याने वसुलीचे जमा झालेले पैसे पुढे भरलेले नाहीत. व ते पैसे माझे नावावर टाकले आहेत. त्यामुळे लोक आपले घरी येवुन मला पैशाची मागणी करत आहेत तसेच आमचे मॅनेजर हे देखील मला तु शेतक-या कडून जमा झालेले पैसे पुढे भरण्यासाठी दे असे म्हणुन मला पैसे मागत आहेत. मॅनेजर मुकुद बोरकर हे सतत आमचे घरी येवुन पती यांना पैशाची मागणी करत असे.





