तेलंगशी येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा शिबीराची सांगता
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण योजना प्रकल्प या शिबिराचा समारोप सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, सरपंच दिगंबर ढाळे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात व मुख्याध्यापक संतोष गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्ट ऑफ लिवचे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारोप करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण व जीवन कौशल्य शिक्षण देण्यात आले.
या शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिविंग परिवार तर्फे आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक संतोष थोरात यांनी दहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योग, ध्यान, योगाची ओळख ,अर्थ आणि महत्व, मानवी शरीरचना व शरीर क्रिया ,किशोरवयीन आरोग्यासाठी योग जीवनशैली शिस्त आणि योग्य तत्वे सिद्धांत,
सुरक्षितता मार्गदर्शक तत्वे व सरावाचे नियम, श्वसन अभ्यासामध्ये प्राणायाम ची मूलभूत माहिती सूर्यनमस्कार सराव आसनावर लक्ष केंद्रित करून संतुलन व योग्य स्थितीतील आलायमेन्ट आणि ताकद बैठ्या आसनावर लक्ष केंद्रित ध्यान आणि सहजता आधी विविध विषयावर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी समारोपप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल सिंह राजपूत म्हणाले की आर्ट ऑफ लिंक परिवारात आपल्याला जे दहा दिवस चुकून गेले यामुळे आपल्या बुद्धीत वाढ होऊन शरीर तंदुरुस्त व मजबूत होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
स्वतःची आत्मरक्षा करण्याची कला येथे आपल्याला शिकवण्यात आले आहे आपण स्वतः बरोबर घरच्यांचे परिसराचे व देशाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला एक आत्मनिर्भय व परिपूर्ण पोलीस समजूनच चालत राहावा निश्चितच आपली प्रगती वेळोवेळी होत राहील आपण एकाग्र राहिल्यास आपणाला निश्चितच यश प्राप्त होईल.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवन्नाथ ढाळे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सदस्य अक्षय वायभासे, पोलीस पाटील अर्जुन ढाळे, आर्ट ऑफ लिव्ह चे साधक प्रकाश सोनटक्के, पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत मस्के
यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राथमिक शिक्षक अशोक जाधव, बाळासाहेब खेडकर, मल्हारी पाखरे, संतोष खेडकर, रवींद्र धस यांनी परिश्रम घेतले.