गाव बालविवाह मुक्ततेचा निर्धार, जामखेडमध्ये ‘उडान’ अभियानाची कार्यशाळा
बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध-योगेश अब्दुले
बालविवाह ही एक सामाजिक समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी सामूहिक लढा देणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मान्यवरांनी जामखेड येथे आयोजित बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेत केले.स्नेहालय उडान बालविवाह प्रसतिबंधक अभियान,जिल्हा महिला व बालविकास विभाग,जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उडान बालविवाह प्रतिबंध अभियाना’अंतर्गत या विशेष जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन महावीर मंगल कार्यालय जामखेड येथे करण्यात आले होते.
यावेळी विचार मंचावर बालविकास प्रकल्प अधिकारी हिरा सानप,चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी,स्नेहालय उडान प्रकल्पाचे समन्वयक योगेश अब्दुले,महिला सक्षमीकरण केंद्राच्या पूजा ढेरे,विपला फाउंडेशनच्या ऍड. शुभांगी रोहकले, पर्यवेक्षिका आर.एस.जावळे, व्ही.पी. वाघमारे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सावित्रा कदम,राहुल कांबळे आदी उपस्थित होते.
बालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध-योगेश अब्दुले यावेळी स्नेहालय उडान अभियानाचे समन्वयक योगेश अब्दुले म्हणाले की;बालविवाह या समस्याचे निर्मलानासाठी स्नेहालय उडान प्रकल्प अंतर्गत वाड्या वस्त्यांवर,गाव आणि शहरी भाग,शाळा-महाविद्यालय,युवक युवती,प्रत्येक नागरिक आणि प्रशासनासोबत बालविवाह जाणीव जागृतीचे काम सक्रिय सकारात्मक भूमिकेतून करत आहे.अहिल्यानगर जिल्हा २०२७ पूर्वी बालविवाह मुक्ततेसाठी उडान प्रकल्पाचे प्रयत्न,ध्येय आणि कार्यपद्धती स्पष्ट केली.
बालविवाहाचे दुष्परिणाम मांडतानाच बालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थात्मक पातळीवर केल्या जाणाऱ्या कामांची माहिती देत बालविवाह होण्याचे कारणे,त्यावरील उपाययोजना,माझे गाव बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना व बालकांचे प्रश्न आणि बाल संरक्षणासाठी कटिबद्ध आहे असे ते म्हणाले.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे महेश सूर्यवंशी म्हणाले की;काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी तत्परतेने यंत्रणांनी सजगकता दाखविली पाहिजे.जिल्हा महिला व बालविकास विभागा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेत बालविवाह थांबविण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रतिबंत्मक उपाययोजनांवर त्यांनी भर दिला.आणि बालविवाह रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी गरजेची आहे असे ते म्हणाले.
महिला सक्षमीकारणासाठी स्त्री स्वातंत्र्य गरजेचे-पूजा ढेरे
यावेळी महिला सक्षमीकरण केंद्राच्या पूजा ढेरे म्हणाल्या की;महिलांचे हक्क आणि त्यांच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर उपाययोजना होणे आवश्यक आहे.जाचक रूढी परंपरेला फाटा देत मुलगा मुलगी भेद टाळून महिला सक्षमीकारणासाठी स्त्री स्वातंत्र्य गरजेचे आहे.असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.शासनामार्फत महिलांच्या उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बालविवाहतून निर्माण होणारा कौटुंबिक हिंसाचार रोखुया-ऍड.शुभांगी रोहकले यावेळी विपला फाउंडेशनच्या ऍड.शुभांगी रोहकले म्हणाल्या की;बालविवाह हा सामाजिक प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.यातून अनेक पातळीवर मुली महिलांचा छळ होत आहे.दाद कुठे आणि कोणाला मागायची यावर समाज मात्र गप्प आहे.हा अबोला समाजाला अनेक पिढ्या मागे घेऊन जाणारा आहे.कौटुंबिक हिंसाचार कायद्या,बालकांना तातडीने संरक्षणाची गरज आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण कसे करावे आणि बालविवाहतून निर्माण होणारा कौटुंबिक हिंसाचार रोखुया असे परखड भाष्यही त्यांनी केले.
किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक विकासासाठी बालविवाह प्रतिबंध आणि पोषणाची गरज-सावित्रा कदम यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सावित्रा कदम म्हणाल्या की;बालविवाहामुळे बालकांचे शारीरिक,मानसिक वाढ खुंटून अनेक प्रश्न आणि समस्या उभ्या राहिल्या आहेत.बालविवाहामुळे सकस आणि संतुलित आहार किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक विकासासाठी पोषणाची गरज असे त्या म्हणाल्या.या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी,२२५ अंगणवाडी सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.या मोहिमेत सर्व स्तरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून बालविवाहाची माहिती मिळाल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी योगेश अब्दुले,राहुल कांबळे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.