Sunday, March 8, 2026
Home ताज्या बातम्या जगात एकच धर्म तो म्हणजे सनातन धर्म बाकी सगळे पंथ – महंत...

जगात एकच धर्म तो म्हणजे सनातन धर्म बाकी सगळे पंथ – महंत रामगिरी महाराज जामखेड मध्ये विराट हिंदू संमेलन

0
5

जामखेड न्युज—–

जगात एकच धर्म तो म्हणजे सनातन धर्म बाकी सगळे पंथ – महंत रामगिरी महाराज

जामखेड मध्ये विराट हिंदू संमेलन

जगात एकच धर्म, तो म्हणजे सनातन धर्म
भगवद्‌गीतेतही हे सांगितलं आहे की, सनातन संस्कृती एक गालात मारल्यावर पुढचा गाल पुढं करत नाही. हिंसा कुणी करत असेल तर ती सहन का करावी? आपण आजपर्यंत अन्याय सहन करत आलोय हे आपले दुर्दैव आहे. जगात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म. बाकी सगळे फक्त पंथ आहेत. अन्याय करणारे अधर्मी आहेत, असा धर्म असूच शकत नाही, असा हल्लाबोल रामगिरी महाराजांनी यावेळी केला.

हिंदू समाजात एकता व संघटन वाढवण्यासाठी जात, पंथ, भाषा भेद विसरून एकत्र येऊन हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मुल्यांचे संरक्षण व संवर्धन करून राष्ट्रीयत्व व देशभक्तीची भावना जागृत करणे हा उद्देश समोर ठेवून जामखेड शहरात
फाल्गुन कृ. ४ शके १९४७, शनिवार दि. ७ मार्च २०२६ वेळ: सायं ६.०० भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. 

जामखेड महाविद्यालय जामखेड येथे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी महंत रामगिरी महाराज बोलत होते. यावेळी महेश करपे प्रांत कार्यवाहक पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मेघा चिंतामणी भाग संवादिनी शेशेवग तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद होत्या यावेळी बस स्थानकापासून जामखेड महाविद्यालयापर्यत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि मालमत्ता सरकारने परत घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द व्हावा धर्मासाठी संघ उभा राहिला शंभर वर्षे काम सुरू खरा धर्म सनातन बाकी पंथ जो सर्वाना धारण करतो तो धर्म, परकीयांनी लुटी बरोबर अन्याय अत्याचार केले. तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात समाजातील संत-महंतांनी स्वतःचा संप्रदाय, मठ आणि पोटजाती यांचा विचार न करता हिंदु धर्मासाठी संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला पाहिजे.

सनातन संस्कृती टिकवायची नाही तर वाढवणे आपली जबाबदारी आहे. मुलांवर चांगले संस्कार करा व्यसनापासून दूर राहावे,अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे अन्यायाला प्रतिकार करणे आपले काम आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन का होत नाही. याविषयी खंत व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!