महिला जागतिक दिनानिमित्त निवारा बालगृह मोहा फाटा समता भूमी येते प्रदर्शित होणार
येथील निवारा बालगृह, मोहा फाटा, समता भूमी बीड रोड येथे ॲड. अरुण (आबा) जाधव नगरसेवक यांचा ‘काळीमा’ या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण अनाथ मुलांच्या हस्ते करण्यात आले.
‘काळीमा’ या शॉर्ट फिल्मची टॅगलाईन “विशिष्ट जातीला लागलेला कलंक” अशी आहे. भटके विमुक्त, आदिवासी जातीला लागलेला ठिपका, म्हणजेच कलंक याचे प्रतीक म्हणून या चित्रपटाला ‘काळीमा’ हे नाव देण्यात आले आहे.आणि हाच काळीमा नावाचा लघु चित्रपट येणाऱ्या 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्ताने निवारा बालगृह मोह फाटा समता भूमी येते हजारोच्या संख्येने प्रदर्शित होणार आहे.
यावेळी बोलताना अरुण (आबा )जाधव यांनी भटके-विमुक्त आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. भटके-विमुक्त समाजावर, आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि जाळपोळ,जीवघेणे हाल्ले,सामाजिक कलंकाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अरुण (आबा) जाधव स्वतः भटके-विमुक्त समाजातून आलेले असल्यामुळे या समाजाच्या वेदना आणि संघर्षाची त्यांना जवळून जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष चव्हाण सर यांनी केले .या शॉर्ट फिल्मची कथा, पटकथा आणि दिग्दर्शक :- सचिन चव्हाण यांनी केले असून निर्माते :- उमाताई जाधव यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
या कार्यक्रमास सचिन भिंगारदिवे, रेश्मा बागवान, बापू ओव्होळ,ऋषिकेश गायकवाड, , , संगीता केसकर, जाकीर मामा, गौतमी गंगावने, छाया मोरे, भक्ती पवार, संदीप आखाडे व बालगृहातील मुले, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैजीनाथ केसकर सर यांनी केले.