Tuesday, March 3, 2026
Home ताज्या बातम्या भटके विमुक्त आदिवासी यांच्या न्यायासाठी एक पाऊल पुढे – लोकविकास सेवाभावी संस्थेचे...

भटके विमुक्त आदिवासी यांच्या न्यायासाठी एक पाऊल पुढे – लोकविकास सेवाभावी संस्थेचे भव्य उद्घाटन

0
2

जामखेड न्युज—–

भटके विमुक्त आदिवासी यांच्या न्यायासाठी एक पाऊल पुढे – लोकविकास सेवाभावी संस्थेचे भव्य उद्घाटन

जामखेड तालुक्यातील ४२ गावांमधील भटके-विमुक्त आदिवासी बांधवांना नागरिकत्व पुरावा मिळवून देणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत.

अनेक कुटुंबांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, शासकीय कार्यालयांशी समन्वय साधणे आणि योग्य मार्गदर्शन करणे ही कामे संस्थेमार्फत करण्यात येणार आहेत.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुस्तफा शेख (मेजर) यांनी आभार प्रदर्शन करत भावनिक आठवण सांगितली. लहानपणी राजू शिंदे हे खर्डा चौक, एसटी स्टँड, बाजारतळ परिसरात भिक्षा मागत असत; मात्र पुढे जाऊन ते इतके मोठे सामाजिक कार्य उभे करतील, असे तेव्हा वाटले नव्हते. आज त्यांच्या सोबत काम करण्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच भटके-विमुक्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्था कायम प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर संस्थेचे उपाध्यक्ष मा.राजू शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला.

आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अरणगाव, पाटोदा, भवरवाडी, नान्नज, जवळा, सोनेगाव, खर्डा, पिंपरखेड, हळगाव, आरोळ वस्ती व जामखेड येथून एकल महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

एकल महिला, विधवा, वृद्ध व दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था प्रामाणिक प्रयत्न करणार असून समाजातील वंचित घटकांना न्याय व संधी मिळवून देणे हीच आमची खरी बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण व युवक मार्गदर्शन या क्षेत्रात कार्य करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचवणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. विकी भाऊ सदाफुले यांनी संस्थेच्या कार्यालयाचे कौतुक करत सामाजिक कार्य सातत्याने आणि प्रामाणिकपणे पुढे नेण्याचे आवाहन केले व शुभेच्छा दिल्या.


बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले की संस्था अनेक असतात; मात्र खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणे अत्यंत गरजेचे आहे. खेड्यापाड्यातून महिलांची मोठी उपस्थिती ही राजू शिंदे यांच्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगर सेवक इस्माईल सय्यद, नगरसेवक महेश दादा निमोणकर, इम्रान शेख सर, भीमराव चव्हाण इरफान शेख, तसेच ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राजू शिंदे यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेऊन गोरगरीब व गरजू लोकांना न्याय मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजश्री ताई मोरे (पाटोदा), शारदा ताई जाधव (जवळा) यांसह अनेक महिलांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी नितीन आहेर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अजिनाथ शिंदे यांनी केले. व उपस्थित मान्यवर नासिर चाचू सय्यद, गणेश काळे, अंजुम मेजर, निर्मला माने, मनोज आंधळे, बजरंग डूचे, अण्णा मोरे, विकी पिंपळे, आदि उपस्थित होते व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष शेगर, मोहन शिंदे, नितीन आहेर, आकाश शेगर, अरबाज सय्यद, सागर चव्हाण, मनोज जाधव, विक्रम सावंत, विक्रम साहेबराव शिंदे, मोहन चव्हान, तानाजी चव्हाण, विजय शेगर, अशोक शिंदे, विशाल शिंदे, सूरज चव्हाण, सुनिता ताई कांबळे, खालिदा सय्यद, कविता जावळे, खुशाल शेगर, चिराग शेगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!