Monday, March 2, 2026
Home ताज्या बातम्या न्याय मिळेपर्यंत सत्कार नको – मनोज जरांगे पाटील जामखेडच्या अतिक्रमण हटाव...

न्याय मिळेपर्यंत सत्कार नको – मनोज जरांगे पाटील जामखेडच्या अतिक्रमण हटाव साखळी उपोषणाला पाठिंबा

0
2

जामखेड न्युज—–

न्याय मिळेपर्यंत सत्कार नको – मनोज जरांगे पाटील

जामखेडच्या अतिक्रमण हटाव साखळी उपोषणाला पाठिंबा

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या अनाधिकृत अतिक्रमण व कामातील अनियमितते विरोधात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. सदर उपोषणास आज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

गेल्या सहा दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या साखळी उपोषणामागील भूमिका जाणून घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. वाढती अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवली गेली पाहिजेत.”

यावेळी त्यांनी पुढे असेही नमूद केले की, संबंधित अधिकाऱ्यांसोबत नेमकी आजच सभापती प्रा. राम शिंदे यांची जामखेडमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळाली असून, त्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील भूमिका जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो.मात्र, शहरातील रस्त्यालगतची अनधिकृत अतिक्रमणे काढलीच पाहिजेत, जामखेडकरांच्या पाठिशी मी ठाम उभा आहे काळजी करू नका असेही ते म्हणाले.

या आंदोलनात अत्तापर्यंत सर्वच राजकीय पक्षांबरोबर जामखेड शहर बचाव कृती समिती, मुस्लिम पंच कमिटी,जामखेड तालुका वकील संघ, वंचित बहुजन आघाडी, त्रिदल माजी सैनिक संघटना, डॉक्टर असोशिएशन, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, जिव्हाळा फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ या सामाजिक संघटना समवेत नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत.

यावेळी उपोषणस्थळी दै. सुर्योदय चे संपादक गंगाधर काळकुटे, ज्येष्ठ नागरिक प्रा.शहाजी डोके, रंगनाथ राळेभात,उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, विकास (तात्या) राळेभात, शहाजी काका राळेभात, संभाजी राळेभात, मंगेश (दादा) आजबे, प्रदीप टापरे, नगरसेवक आश्रु शेळके, पवन राळेभात, प्रवीण सानप, प्रा. विकी घायतडक, प्रा.लक्ष्मण ढेपे, संभाजी मुळे, हनुमंत मोरे, गणेश वारे, सचिन घुमरे, राहुल उगले, विनायक राऊत, अनिल सदाफुले, संभाजी ढोले, संजय डोके उमेश राळेभात, महेश यादव, तात्यासाहेब बांदल, आण्णासाहेब मुरूमकर आदि मान्यवर तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

चौकट

जोपर्यंत जामखेड करांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्विकारणार नाही – जरांगे पाटील

 

जामखेड येथे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणाला आज मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला यावेळी उपस्थित नागरिकांनी जरांगे पाटील यांचा सत्कार करण्याचे ठरविले मात्र जरांगे पाटील यांनी सत्काराला नकार देत म्हणाले जोपर्यंत जामखेड शहरातील अतिक्रमणे निघत नाहीत व जामखेड करांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्विकारणार नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!