विनापरवाना फ्लेक्स वरून नायगाव येथील यात्रेत वादंग, ३८ जणांवर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे महाशिवरात्री व श्रीनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या (१७ फेब्रुवारी २०२६) निमित्ताने बीएसएनएल चौकासमोर “महाशिवरात्री व श्रीनाथ महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे स्वागत” असा फ्लेक्स लावण्यात आला.
यावर ३८ जणांचे फोटो व नावे (मिथुन साहेबराव ढावरे, अमोल साहेबराव ढावरे, लखन बबन मिसाळ, समाधान लक्ष्मण साठे, आदेश दशरथ खवळे इ.) छापील होते. हा फ्लेक्स विनापरवाना बेकायदेशीर लावल्याने फोटोवरील व्यक्तींमधून वाद उफाळला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष मुरलीधर उगले (पोलीस पाटील, नायगाव) यांच्या तक्रारीवर खर्डा पोलीस स्टेशनने गुन्हा क्र. २१/२०२६ दाखल केला. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम २२३ (सार्वजनिक शांतता भंग), ३(५) व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ कलम ३ अंतर्गत नोंद.
संपूर्ण आरोपींची यादी (३८ जण, सर्व रा. नायगाव/सोनेगाव ता. जामखेड):
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पो.स्टे प्रभारी सहाय्यक पीआय उज्वलसिंह राजपूत यांनी कारवाई केली. पीए दशरथ नागरगोजे, संदीप धामणे, प्रविण थोरात, शशिकांत म्हस्के, धनराज बिराजदार यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास पो.हवा. संदीप धामणे करत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत म्हणाले, “नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय फ्लेक्स लावू नये. यात्रा-उत्सवात विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.