Home ताज्या बातम्या शिवजयंती निमित्त तेलंगशी येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन रक्तदात्याला शिवप्रेमी सचिन (नाना)...

शिवजयंती निमित्त तेलंगशी येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन रक्तदात्याला शिवप्रेमी सचिन (नाना) घुमरे यांच्या वतीने ट्रॅक सूटचे वाटप

0
4

जामखेड न्युज—–

शिवजयंती निमित्त तेलंगशी येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

रक्तदात्याला शिवप्रेमी सचिन (नाना) घुमरे यांच्या वतीने ट्रॅक सूटचे वाटप

जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती तेलंगशी च्या वतीने विविध सामाजिक उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबीर, झांजपथक, लेझीम पथकासह भव्य दिव्य अशी मिरवणूक तसेच राजेंद्र महाराज सावंत बीडकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान शिबीरातील रक्तदात्याला शिवप्रेमी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या वतीने ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले.

तेलंगशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजन करून रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते.

परिसरातील 95 युवकांनी सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली

झांजपथक, लेझीम पथकासह भव्य दिव्य अशी मिरवणूक तसेच राजेंद्र महाराज सावंत बीड यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. 

त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक होऊन गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची सुंदर असे कार्यक्रम झाले त्यानंतर महाप्रसाद होऊन कीर्तन झाले व कार्यक्रमाची सांगता झाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!