जामखेड न्युज—–
जामखेड च्या नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपूर येथे विठ्ठल रूक्मिणीची गंगेच्या पवित्र जलाने चंदनओटी महापूजा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत जगदपिता भगवान श्री पांडुरंग परमात्मा व रुक्मिणी माता यांची महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर जामखेड च्या नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते सपत्नीक गंगेच्या पवित्र जलाने चंदन ओटी महापूजा करण्यात आली.

श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थान पंढरपूर यांनी चिंतामणी यांना पुजेचा सपत्नीक मान दिला. चिंतामणी यांच्या वतीने दोन्ही संस्थानाचे आभार मानण्यात आले.

जामखेड च्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी व त्यांचे पती अमित चिंतामणी यांच्या हस्ते सपत्नीक गंगेच्या पवित्र जलाने चंदन ओटी महापूजा करण्यात आली.
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आली. देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी ७५० ग्राम उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येते.

यापूर्वी हे चंदन उगाळण्यासाठी १० कर्मचारी सलग ४ महिने हे काम करीत असत. मात्र, चंदन उगाळण्याचे मशीन आणल्याने काही तासातच हे काम मशीन करत आहे.

विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते.




