Home ताज्या बातम्या ठेकेदाराचा प्रताप साकत घाटातील खड्डे मातीने बुजवले, वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास...

ठेकेदाराचा प्रताप साकत घाटातील खड्डे मातीने बुजवले, वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास इस्टीमेट नुसार काम करावे म्हणून हरिभाऊ मुरूमकर करणार उपोषण

0
4

जामखेड न्युज——

ठेकेदाराचा प्रताप साकत घाटातील खड्डे मातीने बुजवले, वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास

इस्टीमेट नुसार काम करावे म्हणून हरिभाऊ मुरूमकर करणार उपोषण

         

जामखेड साकत रस्त्याची खुपच दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. सावरगाव फाटा ते पाटोदा सरहद्द पर्यंत खड्डे बुजवणे डागडुजी करण्याचे काम झाले पण काम खुपच थातूरमातूर निकृष्ट दर्जाचे झाले. तसेच अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम तसेच ठेवले ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे आठच दिवसांत रस्ता परत खड्डे मय झाला यावर उपाय म्हणून ठेकेदाराने चक्क मातीने खड्डे बुजवले आहेत. यामुळे गाड्या घसरणे, धुळीचा त्रास यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात.

 

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या, काम अपुर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई होणार असा प्रश्न जनता विचारत आहे. अनेक गाड्या घसरून अपघात होत आहेत. मातीमुळे तर आता कहरच झाला आहे. इस्टीमेट नुसार काम झाले नाही तर १६ तारखेला बांधकाम विभाग कार्यालयाला टाळे लावणार व १७ पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा हरिभाऊ मुरूमकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आता ठेकेदारावर काय कारवाई होणार हे पाहणे आवश्यक आहे.

खड्ड्यामुळे एका महिन्यात ऊसाच्या दहा गाड्या पलटी झाल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खड्ड्यामुळे गाड्या पलटी होत आहेत. ठेकेदार खड्डे का बुजवत नाही. त्याला नेमके कोणाचे अभय आहे. बांधकाम विभाग ठेकेदारावर काय कारवाई करणार असा प्रश्न लोक विचारत आहेत.

 

अवजड वाहनांना घाट चढणे खुपच कठीण होत आहे. तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्धवट खड्डे बुजवून काम ठप्प झाले आहे. नेहमीच अपघात घडत आहेत. घाटात तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यातच घाटातील खड्ड्यामुळे नेहमीच अपघात होत आहेत. घाटात वळणावर खड्ड्यामुळे नेहमीच अपघात होत आहेत. ताबडतोब बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी तसेच दर्जेदार काम न झाल्यास बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा हरिभाऊ मुरूमकर यांनी दिला आहे.

सध्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होत आहे. पण रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऊसाच्या गाड्या पलटी होत आहे. तसेच हार्वेस्टिंग च्या साहाय्याने ऊस तोडणी करून ऊसाचे तुकडे करून गाड्या या मार्गाने जातात पण खड्ड्यामुळे गाड्या जास्त हालतात आणि ऊसाचे तुकडे वाहनचालकांच्या अंगावर पडतात यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. लवकरात लवकर सर्व खड्डे चांगल्या प्रकारे बुजवावेत अशी मागणी होत आहे.

जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली होती रस्त्यावर मोठ मोठे खड्डे होते. रस्त्याची चाळणी झाली होती. वाहने खिळखिळी तर वाहनचालकांचे मनके खिळखिळी होत होते. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे टेन्डर निघाले ज्या ठेकेदाराने काम घेतले त्यांने खुपच निकृष्ट दर्जाचे काम केले. तसेच अनेक ठिकाणी अर्धवट काम केले. त्यामुळे आठच दिवसांत परत जैसे थे परिस्थिती झाली आहे.

ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी आण्णासाहेब मुरूमकर यांनी केलेली आहे. नियमानुसार इस्टीमेट नुसार काम होणे आवश्यक आहे पण तसे होत नाही यामुळे आठ दिवसात खड्डे पडत आहेत. यातच निकृष्ट कामाचा नमुना समोर येत आहे. ठेकेदाराची मनमानी दिसून येत आहे. बांधकाम विभागाने ताबडतोब निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मुरूमकर यांनी केली आहे. आता १७ फेब्रुवारी पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही
यातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. नेहमीच अपघात होत आहेत.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी केली होती यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे पण चांगल्या प्रकारे खड्डे बुजवले जात नाहीत.

एका वर्षात साकत घाटात पंधरा ते वीस अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. तर एका महिन्यात दहा गाड्या पलटी झाल्या आहेत. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या खड्डे भुजवावेत अशी मागणी होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!