Home ताज्या बातम्या चोरट्यांचा मंदिरातील सोन्या चांदीच्या ऐवजावर डल्ला, खर्डा परिसरात एकच खळबळ

चोरट्यांचा मंदिरातील सोन्या चांदीच्या ऐवजावर डल्ला, खर्डा परिसरात एकच खळबळ

0
6

जामखेड न्युज——-

चोरट्यांचा मंदिरातील सोन्या चांदीच्या ऐवजावर डल्ला, खर्डा परिसरात एकच खळबळ

जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील जैन श्वेतांबर मंदिरातील चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, मूर्तीवरील मौल्यवान दागिने नगुड्या चोरट्याने लंपास केले असल्याची घटना खर्डा येथे घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरी दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते २९ जानेवारी रोजी सकाळी ७:०० या कालावधीत झाली असून यामुळे चोरट्यांनी पुढील ऐवज लंपास केला आहे.

सोन्याची मालपट्टी (२० ग्रॅम): ६०,००० रुपये,चांदीच्या बारा टिकल्या (१२ भार): ६,००० रुपयेचांदीचा मुकुट (१५ भार): ७,५०० रुपये,चांदीचा नारळ (५ भार): २,५०० रुपये,चांदीचा कंबरपट्टा (८ भार): ४,००० रुपये एकूण किंमत: ८०,००० रुपये ( ऐंशी हजार रुपये)

याबाबत उद्योजक कांतीलाल मोतीलाल खिवंसरा (वय ६०, रा. खर्डा, ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्रमांक १२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय दंड संहिता कलम ३०५(डी), ३३१(४) प्रमाणे दाखल झाला असून, ३० जानेवारी रोजी दुपारी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्याने मंदिराचा लाकडी दरवाजाचा कुलूप तोडून आत शिरला आणि मूर्तीवरील सोने-चांदीचे दागिने लबाडीने चोरून नेले आहेत.

सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि उज्वलसिंह राजपूत हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!