अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान मोठे – नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी जामखेड मध्ये सर्वपक्षीय व चाहत्यांच्या उपस्थितीत शोकसभा संपन्न
अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान मोठे – नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी
जामखेड मध्ये सर्वपक्षीय व चाहत्यांच्या उपस्थितीत शोकसभा संपन्न
राज्याचे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब वंचित व बहुजन समाजाचे एक जानते नेतृत्व होते त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महाराष्ट्राला घडवण्याचे व योग्य पद्धतीने नवी दिशा देण्याचे काम केले शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारा पुढे ठेवून काम करणारे जे नेते राज्यात होऊन गेले. त्यात सर्वात वरचा नंबर अजित दादा पवार यांच्या लागतो. येणाऱ्या काळातही त्यांचे सहकारी व परिवाराच्या माध्यमातून दादांच्या विचारातून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे काम व्हावे. हिच खरी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल. तसेच अजित दादा हे एक राजकारणातील धुरंदर व स्पष्टवक्ते होते. वेळेवर काम करणारे. कर्जत जामखेड मतदारसंघात जो मोठा विकास झाला आहे त्यात अजितदादांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान व जनतेचा खंबीर आधार असलेला नेता गमावल्याची भावना नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी शोकसभेत व्यक्त केली.
सकाळी सहा वाजता ते कामाला लागायचे. ते रविवारीही बारामतीच्या विकासासाठी काम करताना दिसायचे. त्यांनी समाजातील अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम केले. ज्यांना समाजकार्याची आवड असायची त्यांना त्यांनी राजकारणात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली. असा नेता पुन्हा होणे नाही. असे प्रतिपादन अनेकांनी व्यक्त केले. दादांनी २४ तारखेच्या सभेत बाबांनो राजकारण बाजूला ठेवा आपल्या सर्व सामान्य जनतेच हित कशात आहे हे पाहून काम करा..याची आठवण करून देत हेच त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊयात हिच खरी त्यांना आदरांजली ठरेल अशी भावना चिंतामणी यांनी व्यक्त केली.
दि. ३० जानेवारी रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शोकसभेचे आयोजन केले होते. या शोक सभेची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भव्य प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, राष्ट्रावादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक महेश निमोणकर, शिवसेनेचे आकाश बाफना, राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, मनसेचे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेसचे नेते राहुल उगले, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, इंदौर नगर परिषदेचे नगरसेवक सुदाम कोल्हे, उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशिद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक वसीम सय्यद, राजेंद्र गोरे, प्रा. विकी घायतडक, पवन राळेभात, नगरसेविका नंदा प्रवीण होळकर, अवधूत पवार, डॉ. भगवान मुरूमकर, बाजीराव गोपाळघरे, सुर्यकांत मोरे, अंजली लक्ष्मण ढेपे, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, ज्येष्ठ नेते सुरेश भोसले, वैजनाथ पोले, राजेंद्र पवार, संभाजी राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, अशोक शेळके, कुंडल राळेभात, मंगेश आजबे, स्वप्निल खाडे, प्रविण होळकर, बापुराव शिंदे, संजय वराट, शहाजी राजेभोसले, अमित जाधव, सुनील जगताप, अमोल गिरमे, हरिभाऊ आजबे, उमर कुरेशी, प्रवीण उगले, सचिन शिंदे, अशोक घुमरे, संजय डोके, माजी नगरसेवक गणेश आजबे, बजरंग डूचे, दिपक घायतडक, दत्तात्रय डिसले, इम्रान तांबोळी, आदी मान्यवरांसह तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आजितदादा पवार यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांना संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा याच नावाने ओळखायचा असे दादा तुमच्या आमच्यातून निघून गेले आहेत यावर विश्वास बसत नाही. ज्यांनी महाराष्ट्राचं व पवार कुटुंबाचे नाव या देशात उज्वल केलं, दादांनी सहकारातून आपल्या कामाला सुरुवात केली होती, मात्र सार्वजनिक राजकारणात एक मोठा माणूस म्हणून संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहत होता.
त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र एकादृष्टीने पोरका झाला आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे काम करताना अजित दादांनी कधीही पक्षीय किंवा संघटनेचा विचार न करता सर्वांचे काम केलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व चहात्यांच्या मनाला चुरका लावून दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक महेश निमोणकर म्हणाले की, अजित (दादा) पवार यांचा अपघाती मृत्यू हा मनाला धक्का देणारा आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी जामखेड सारख्या तालुक्याचे तालुकाध्यक्षपद दिले तसेच जामखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्व जबाबदारी देऊन मोठा विश्वास टाकला. अजित दादाच्या जाण्यामुळे मला माझे सर्वस्व गमावल्याचे दुःख झाले आहे. यापुढे मी अजितदादांच्या विचारातूनच राजकारण करणार आहे. त्यांच्या जाण्याने कर्जत जामखेड सह महाराष्ट्राचे जे मोठे नुकसान झाले ते कधीही न भरून निघणारे नाही.
त्यांच्या जाण्याने माझ्यासारखा कार्यकर्ता पोरका झाल्याच्या भावना यावेळी महेश निमोणकर यांनी व्यक्त केल्या.यावेळी उपस्थित सर्वपक्षीय मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत मनोगतातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा व विचाराचा वारसा पुढे चालूनच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला जाऊ शकतो असे विचार व्यक्त केले. शेवटी सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करत पसायदानाने शोकसभेचा समारोप करण्यात आला. या शोकसभेचे सूत्रसंचालन डॉ. कैलास हजारे यांनी केले.