Sunday, February 1, 2026
Home ताज्या बातम्या महाराष्ट्राचा दादा हरवला, जामखेड शहर कडकडीत बंद

महाराष्ट्राचा दादा हरवला, जामखेड शहर कडकडीत बंद

0
18

जामखेड न्युज——-

महाराष्ट्राचा दादा हरवला, जामखेड शहर कडकडीत बंद

 

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीमुळे जामखेड शहरात व्यापारी व नागरिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असताना राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला या विमान अपघातात अजितदादांसह सहा जणांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जामखेड शहरातील व्यापारी नागरिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठ तसेच मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बंद चे आवाहन करण्यात आले होते. तसेच अनेक नेत्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली व कडकडीत बंद पाळण्यात आला.

अजित पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी आणि कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जात होते. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा हा लोकनेता अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.अजितदादांचे जाणे हा केवळ एका पक्षाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा तोटा असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या त्यांच्या निधनाने राज्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळल्याच्या भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.

बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात अजित पवार यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!