जामखेडमध्ये संविधान महोत्सवात विविध कार्यक्रमांसह मान्यवरांचा पुरस्कार वितरण व तुफानातले दिवे फेम अजय देहाडे यांचा कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहावे समस्त भिमसैनिकांचे आवाहन
जामखेडमध्ये संविधान महोत्सवात विविध कार्यक्रमांसह मान्यवरांचा पुरस्कार वितरण व तुफानातले दिवे फेम अजय देहाडे यांचा कार्यक्रम
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे समस्त भिमसैनिकांचे आवाहन
जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारी २०२६ रोजी“संविधान महोत्सव – २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.”उत्सव देशाचा… जल्लोष संविधानाचा… वारसा आंबेडकरी चळवळीचा…” या प्रेरणादायी घोषवाक्या सह हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यंदा या संविधान महोत्सवाचे १३ वे वर्ष असून, दरवर्षी प्रमाणे यंदाही संविधान सन्मानदिन मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यात भव्य मोटारसायकल रँली, संविधान प्रतिमा पुजन, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान व सुप्रसिद्ध गायक झी युवा संगीत सम्राट – ” तुफानातले दिवे” फेम अजय देहाडे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त भिमसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार व माजी मंत्री सुरेश (आण्णा) धस, आमदार रोहित पवार, दशरथ चौधरी पोलीस निरीक्षक, मच्छिंद्र पाडळे तहसीलदार, अजय साळवे मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद, शुभम जाधव गटविकास अधिकारी, तालुक्यातील सर्व पत्रकार, वकिल असोसिएशन, सर्व राजकीय पदाधिकारी प्रमुख अतिथी असतील
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून करण्यात येणार सन्मान वैद्यकीय क्षेत्र डॉ सुशिल पन्हाळकर, सामाजिक व क्रीडा क्षेत्र संतोष टेकाळे, पत्रकारिता क्षेत्रात सुदाम वराट, शैक्षणिक क्षेत्रात श्रीकांत होशिंग, वृक्ष मित्र उत्तम पवार यांना जाहीर करण्यात आला आहे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधाना मुळे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुताआणि न्याय ही मूलभूत मूल्ये प्राप्त झाली आहेत.त्याच संविधानाच्या सन्मानार्थ जामखेड शहरात दरवर्षी संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ यावर्षीचा संविधान महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, बाजारतळ, जामखेड येथे आयोजित करण्यात आला आहे. दिनांक: सोमवार, २६ जानेवारी २०२६ वेळ: सकाळी ११.०० वाजतास्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, बाजारतळ, जामखेड
कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी १० वाजता भव्य संविधान सन्मान” मोटरसायकल रॅली, सकाळी ११ वाजता, भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन व पुरस्कार वितरण समारंभ यानंतर अजय देहाडे यांचा विशेष कार्यक्रम या संविधान महोत्सवात सुप्रसिद्ध गायक झी युवा संगीत सम्राट – ” तुफानातले दिवे”फेम अजय देहाडे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ते आपल्या गीतांच्या माध्यमातून, भारतीय संविधानाची ताकद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ऊर्जा देणार आहेत.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहनसमस्त भिमसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक व सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले यांनी दिली.