Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या माँणटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत डॉ सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी संघ...

माँणटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत डॉ सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी संघ राज्यात प्रथम शालेय स्पर्धेत राज्यात 4 थे स्थान

0
108

जामखेड न्युज——

माँणटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत डॉ सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी संघ राज्यात प्रथम

शालेय स्पर्धेत राज्यात 4 थे स्थान

 

गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मॉनिटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विद्यालय यांचा शालेय क्रिकेटचा संघ चतुर्थ तर ओशन क्रिकेट ॲकॅडमी पाटोदा याचा संघ मॉन्टेक्स वॉल असोसिएशन स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम प्रथम आला.

स्पर्धा जिंकून वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा चा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला होता या संघाने राज्यस्तर मध्ये सहभाग घेऊन चतुर्थ क्रमांक मिळवला.

गोंदिया येथे आयोजित राज्यस्तर मॉन्टेक्स बॉल असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये 17 वर्षीय वयोगटांमध्ये ओशन क्रिकेट ॲकॅडमी ही तांबे सर यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी राज्यस्तरांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.

या स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक संघ सहभागी झाले होते. राज्यात प्रथम येऊन पाठवण्याच्या या संघाने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या अगोदरही रोशन क्रिकेट ॲकॅडमीच्या मुलांनी राज्यस्तर टेनिस क्रिकेटमध्ये सीनियर गटामध्ये दोन वेळेस प्रथम नॅशनल स्पर्धेमध्ये दोन वेळेस तृतीय एकदा प्रथम येण्याचा मान मिळवला तसेच या संघामध्ये अविनाश शिंदे विश्वजीत गायकवाड आर्यन बनकर संग्राम शिंदे साईनाथ बांगर आयुष येवले पृथ्वीराज बहिर गणेश थोरवे आदित्य थोरवे कृष्णा नाईक नवरे यश नेमाने समर्थ दीक्षित प्रवीण दराडे हर्षदा आवारे यांचा समावेश होता.

यांना राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ सुशील जालिंदर तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे राज्यभर कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!