Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या डॉ. स्नेहल प्रतिक मुरूमकर यांच्या श्री साकेश्वर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात...

डॉ. स्नेहल प्रतिक मुरूमकर यांच्या श्री साकेश्वर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न बंधुप्रेम व सामाजिक कार्यात मुरूमकर बंधु अग्रेसर

0
124

जामखेड न्युज——-

डॉ. स्नेहल प्रतिक मुरूमकर यांच्या श्री साकेश्वर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

बंधुप्रेम व सामाजिक कार्यात मुरूमकर बंधु अग्रेसर

डॉ. स्नेहल प्रतिक मुरूमकर यांच्या श्री साकेश्वर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा साकत ता. जामखेड येथे मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, प्रा. श्रीराम मुरूमकर, दत्तात्रय मुरूमकर व डॉ. भगवानराव मुरूमकर यांचे बंधुप्रेम आदर्श आहे. तसेच सामाजिक कामही खूप मोठे आहे. याच बरोबर डॉ. विवेक मुरूमकर यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान खुपच मोठे आहे. आता पंचक्रोशीतील नागरिकांना डॉ. स्नेहल प्रतिक मुरूमकर यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

श्री साकेश्वर हॉस्पिटलचे उद्घाटन माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. उत्तम महाराज वराट, सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, प्रा. दत्तात्रय मुरुमकर, प्रा. अरुण वराट, माजी उपसभापती मार्केट कमिटी कैलास वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट,उपसरपंच राजू वराट, गणेश वराट, विठ्ठल वराट, ऋषिकेश पाटील, सुरेशभाऊ वराट, हनुमंत वराट, पोलीस पाटील महादेव वराट, ईश्वर मुरूमकर, भरत लहाने, रमेश आडसुळ, हरिभाऊ मुरूमकर, संपत मुरूमकर, गणेश मुरूमकर, रामभाऊ मुरुमकर, दिनकर मुरूमकर, मिलन घोडेस्वार, डॉ. बाबू वराट,
वैभव मुरूमकर, दिलीप मुरूमकर, भाऊसाहेब मुरुमकर, महारुद्र नेमाने, दिलीप घोलप, भीमा टेकाळे, साहेबराव कडभने, रामहरी नेमाने, संजय बापू मुरूमकर, शिवाजी घोडेस्वार, विनोद मुरुमकर, दत्ता मुरुमकर, कल्याण मुरुमकर, भागवत मुरूमकर,अरुण मुरूमकर, अशोक घोलप , विजय घोडेस्वार, रमेश मुरूमकर, अँड. शिवप्रसाद पाटील, बाळू गवळी बापू घोडेस्वार, महादेव वराट, मधुकर लहाने, शहादेव कोल्हे, नाना गवळी,जयराम कोल्हे, डॉ. सतीश घोलप, राहुल वराट, अमोल वराट सावकार, नागराज मुरुमकर, पियुष मुरुमकर, ऋषीकेश लहाने, शंकर मुरुमकर,संदिप मुरुमकर व समस्त साकत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

श्री साकेश्वर हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांसह २४x७ आरोग्यसेवा, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला, प्राथमिक उपचार व विविध तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रुग्णसेवेला प्राधान्य देत ग्रामीण भागातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा देणे हा या रुग्णालयाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ .स्नेहल प्रतिक मुरूमकर यांनी सांगितले. 

या हॉस्पिटलमध्ये जनरल फिजिशियन, स्त्रीरोग उपचार, बालरोग उपचार, तसेच सांधेदुखी व गुडघेदुखीवरील उपचार उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अत्याधुनिक केअर सुविधांतर्गत इंजेक्शन व सलाईन सुविधा, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी तपासणी, ब्लड शुगर तपासणी, नेब्युलायझेशन (वाफ देणे), स्त्रीरोग तपासणी तसेच रक्त व लघवी तपासणी या सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.

साकतसारख्या ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जामखेड येथे घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. या हॉस्पिटलचा लाभ कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कढभनवाडी तसेच परिसरातील नागरिकांना विशेषतः होणार असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

श्री साकेश्वर हॉस्पिटलमुळे साकत व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!