Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड नगरपरिषद स्थायी समिती सभापती निवडी जाहीर पहा कोणाला मिळाले कोणते...

जामखेड नगरपरिषद स्थायी समिती सभापती निवडी जाहीर पहा कोणाला मिळाले कोणते खाते

0
2740

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषद स्थायी समिती सभापती निवडी जाहीर

पहा कोणाला मिळाले कोणते खाते

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पंधरा नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर घवघवीत यश संपादन केले आज प्रातांधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सभापती निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी सभापती प्रांजल चिंतामणी, व सर्व नगरसेवक हजर होते. 

जामखेड नगरपरिषद स्थायी समितीच्या निवडीसाठी आज विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यात नियोजन, विकास, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता व आरोग्य पाणीपुरवठा व जलनिस्सारण, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक अशा समित्यांच्या सभापती निवडी जाहीर करण्यात आल्या


,

1 सौ. प्रांजल अमित चिंतामणी – सभापती (महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नगरीअधिनियम, 1965 चे कलम 66 (1) (अ) नुसार) खालील निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

पोपट दाजीराम राळेभात – सदस्य (सभापती, नियोजन आणि विकास समिती)

सौ. जया संतोष गव्हाळे – सदस्य ( सभापती, महिला व बाल कल्याण समिती)

श्री. मोहन सिताराम पवार – सदस्य ( सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती)

सौ. वैशाली अर्जुन म्हेत्रे -सदस्य (सभापती, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती )

श्री. श्रीराम अजिनाथ डोके – सदस्य (सभापती, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती)

श्री. प्रविण विठ्ठल सानप – सदस्य (सभापती, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती)

अशा प्रकारे निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!