कै. दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांच्या स्मरणार्थ श्री साकेश्वर मंदिरातील शिवलिंगास दहा किलो चांदीचा जलधारी बसवणार

0
328

जामखेड न्युज——-

कै. दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांच्या स्मरणार्थ श्री साकेश्वर मंदिरातील शिवलिंगास दहा किलो चांदीचा जलधारी बसवणार

जामखेड तालुक्यातील साकत येथील मुळ रहिवाशी व सध्या बुलढाणा येथे स्थायिक असलेले अडसुळ कुटुंब हे निस्सीम साकेश्वर महाराजांचे भक्त यातच दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांचे नोव्हेंबर महिन्यात निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साकेश्वर मंदिरातील शिवलिंगास दहा किलो वजनाचा चांदीचा (अरघा) जलधारी बसवण्यात येणार आहे.

दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांनी साकत मध्ये शेती बरोबर कपडे शिवणकाम व्यवसाय केला नंतर त्यांनी साकत सोडले व बुलढाणा येथे किराणा दुकान सुरू केले. मोठ्या चिकाटीने व्यवसाय करत बुलढाणा येथे नावलौकिक मिळवला आज बुलढाणा येथे आडत, किराणा हे व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू आहेत. 

कै. दत्तात्रय एकनाथ अडसुळ यांच्या स्मरणार्थ श्री साकेश्वर मंदिरातील शिवलिंगास दहा किलो वजनाचा चांदीचा अरघा जलधारी बसवण्यासाठी कोलकाता येथील कारागीर आले होते सर्व मोजमाप घेऊन महाशिवरात्रीच्या आगोदर जलधारी बसवण्याचे काम पूर्ण होणार आहे असे सांगितले.

कै. दत्तात्रय एकनाथ अडसूळ बुलढाणा यांच्या स्मरणार्थ साकेश्वर मंदिर साकत येथे शिवलिंगास 10Kg चांदीचा विशाल अरघा (जलधारी) बनवण्यासाठी कलकत्ता चे कारागीर समवेत अडसुळ कुटुंब होते.

कै. दत्तात्रय एकनाथ अडसूळ यांच्या पत्नी
गंगुबाई अडसुळ, मुलगा गजानन अडसुळ आणि विजय अडसुळ, गजानन यांचे दोन मुले अनिकेत व धनंजय, विजय यास एक मुलगा अभिषेक एक मुलगी रेणुका हे उपस्थित होते.

महाशिवरात्रीला श्री साकेश्वर महाराज देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात रूद्राभिषेक तसेच पालखी सोहळा असतो. महाशिवरात्रीच्या आगोदर जलधारी बसवण्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे अडसुळ कुटुंबीयांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here