तुतारी चिन्ह गायब करण्यासाठी आमदार रोहित पवारांचे मोठे योगदान – डॉ. भगवानराव मुरूमकर भाजपचे विचार, संघटन आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळेच हे यश – संजय काशिद महानगरपालिका निवडणूकीतील घवघवीत यशाबद्दल जामखेड येथे भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा
तुतारी चिन्ह गायब करण्यासाठी आमदार रोहित पवारांचे मोठे योगदान – डॉ. भगवानराव मुरूमकर
भाजपचे विचार, संघटन आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळेच हे यश – संजय काशिद
महानगरपालिका निवडणूकीतील घवघवीत यशाबद्दल जामखेड येथे भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा निकाल स्पष्ट झाला असून राज्याच्या राजकारणात भाजपने अभूतपूर्व ‘महाविजय’ संपादन केला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता मोडीत काढत भाजपने मुंबईसह राज्यातील बहुतेक महानगर पालिकेत विजय संपादन केला आहे. याचा आनंदोत्सव जामखेड मध्ये भाजपाच्या वतीने फटाके फोडून पेढे भरवत केला.
जामखेड भाजपा शहर मंडलाच्या वतीने आज रोजी शहरातील महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालय समोर फटाके फोडून व पदाधिकाऱ्यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहर मंडलअध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, ग्रामीण मंडल अध्यक्ष बापुराव ढवळे, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले,माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय काशिद,जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, बाजीराव गोपाळघरे,पांडुरंग उबाळे, नगरसेवक मनोज कुलकर्णी, नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक तथा प्राचार्य विकी घायतडक, मोहन (मामा)गडदे, अर्जुन म्हेत्रे, सोमनाथ पाचरणे,सुरज काळे, गौतम उतेकर,अनिल यादव, अशोक महारनवर,प्रा.जाकीर शेख,भिमराव कापसे,राम पवार, जालिंदर चव्हाण,आरिफ सय्यद, पांडुरंग गर्जे, विष्णू गंभीरे, तुषार बोथरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठं यश मिळविले आहे. हा जनतेने दाखवलेला विश्वास आहे.कर्जत/जामखेड चे आ.रोहित पवार यांनी पुणेसह महाराष्ट्रात तुतारी चिन्ह गायब करण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा उचलला असून पूर्ण राज्यात तुतारी चिन्ह गायब करण्यासाठी मोठं योगदान आहे.
सभापती पै.शरद कार्ले म्हणाले की,सुज्ञ मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या बाजूने कौल दिला आहे.कर्जत / जामखेड चे आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून फिरत होते.पंरतु नगर परिषद व महानगरपालिका निवडणूकीत मतदारांनी सुपडा साफ केला आहे.
ॲड.अजय काशिद म्हणाले की,भारतीय जनता पार्टीचे देशात, राज्यात सरकार असून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेला विश्वास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ ठरला आहे.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठी विकास कामे होणार आहेत.
यावेळी शहर मंडलअध्यक्ष संजय काशिद म्हणाले की,महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा हा दणदणीत विजय म्हणजे जनतेने विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत भगवा झेंडा फडकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला असून भाजपचे विचार, संघटन आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळेच हे यश मिळाले.