शहराच्या विकासाला आता नवी दिशा मिळेल – लक्ष्मीताई पवार जनविकास सेवाभावी संस्थेतर्फे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सन्मान

0
167

जामखेड न्युज——

शहराच्या विकासाला आता नवी दिशा मिळेल – लक्ष्मीताई पवार

जनविकास सेवाभावी संस्थेतर्फे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सन्मान

जनविकास सेवा संस्था, जामखेड यांच्या वतीने उपनगराध्यक्ष पोपट राळेभात तसेच स्वीकृत नगरसेवक प्रवीण चोरडिया, पवन राळेभात व गणेश डोंगरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार व भाजपा युवा नेते राम पवार यांच्या वतीने मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार बोलताना म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवावा, हीच आमची अपेक्षा आहे.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.

संस्था नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांसाठी सहकार्य करत राहील. जनविकास सेवा संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विकासकामे, सामाजिक उपक्रम व लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

या कार्यक्रमास माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, प्रकाश सदाफुले, नगरसेवक हर्षद काळे, भाजप शहर चिटणीस विजय कुलकर्णी, भाऊसाहेब गरड, रुक्साना पठाण, निशा पवार, करण काळे, 

यांच्यासह जनविकास सेवा संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here