जामखेड शहराचा विकास करून चेहरामोहरा बदलणार – अमित चिंतामणी
मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने नगरपरिषद पदाधिकारी व पत्रकारांचा सन्मान
सर्वाच्या सहकार्यने जामखेड शहराचा विकास करून चेहरामोहरा बदलू तसेच शहरात कायमस्वरूपी हिंदू मुस्लिम ऐक्य आबादित ठेवणार याच बरोबर शहराचे विद्रुपीकरण करणारे अतिक्रमणे समुमचाराने हटवून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देणार असे अमित चिंतामणी यांनी सांगितले.
मुस्लिम पंच कमिटी जामखेड यांच्या वतीने प्रथमच जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांचा व पत्रकारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी अमित चिंतामणी, सर्व नगरसेवक तसेच पत्रकार व मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर काझी, उपाध्यक्ष सय्यद मंजुरअली, सेक्रेटरी आबेद खान सर्व सदस्य व पदाधिकारी याच बरोबर कल्लीमुल्ला कुरेशी, शकिल शेख, खिजर खान, अय्यास शेख, शकिल शेख, सोहेल काझी, अय्यास शेख, समीर खान, शेरखान खान, मुख्तार सय्यद, इस्माईल सय्यद, परवेज खान, इमरान कुरेशी, नाजिम काझी, जावेद बागवान, जावीद सय्यद, नादीर शेख, इस्माईल शेख, नय्युम सुभेदार, फरमान शेख, अर्शद शेख, झाहीर शेख, आसिफ शेख, याकुब तांबोळी, जाफर सय्यद, इसहाक नालबंद, शाकीर काझी यांच्या सह या कार्यक्रमाला शहरातील विविध समाजातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमित चिंतामणी बोलताना म्हणाले की, जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतचे अपुरे काम तात्काळ मार्गी लावण्यात येणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच उर्दू शाळेच्या परिसरातील भिंत व दर्ग्याची भिंत याठिकाणी रस्त्याच्या कामासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरभाई काझी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या विचाराने नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांनी काम करावे, दर्गा व उर्दू शाळा तसेच कब्रस्थान, इदगाह, दर्गा अडचणी सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी नगरसेवक व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहराच्या सामाजिक ऐक्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी नगरसेवक व पत्रकार नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य करतील असे सांगितले.