राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ल. ना. होशिंग विद्यालयात ग्लुकोमा सर्जन डॉ. मिसबाह शेख यांचा सत्कार

0
116

जामखेड न्युज—-

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ल. ना. होशिंग विद्यालयात ग्लुकोमा सर्जन डॉ. मिसबाह शेख यांचा सत्कार

 

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी आपल्या मुलाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले.तसेच स्वामी विवेकानंद हे बुद्धीवादी होते तर जगाला नव्हे तर अमेरिकाच्या शिकागो मध्ये भारतीय तत्त्वज्ञान व संस्कृतींची ओळख देणारा युवा म्हणजे स्वामी विवेकानंद हे होय,त्यांचे विचार आजच्या पिढीला व युवकांना प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी केले.

दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच राष्ट्रीय युवा दिनी शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ. मिसबाह फारुख शेख आहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन म्हणून यश संपादन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब पारखे हे होते तर प्रमुख पाहुणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध तसेच अग्रगण्य नाव असलेले डाॅ.फारुख शेख होते.

या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने,पर्यवेक्षक अनिल देडे,जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन चे सचिव डॉ. सादेख पठाण, इंजिनिअर आरिफभाई शेख,डॉ.नजीराबानो शेख, डॉ.मिसबाह शेख यांच्या मातोश्री डॉ. बिलकिस शेख, जेष्ठ पत्रकार नासीरभाई पठाण, धनराज पवार तसेच आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राचार्य पारखे म्हणाले की,१७ व्या शतकात जामखेड ची ओळख संपूर्ण जगाला झालेली होती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभारामुळे तसेच २० व्या शतकात जामखेड ची ओळख रॅमेन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.रजनीकांत आरोळे यांच्या महान कार्यामुळे व प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या कार्यामुळे तर २१ व्या शतकाच्या उत्तरार्धात जामखेड ची ओळख आपल्या विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी डॉ. मिसबाह शेख यांच्यामुळेच, डॉ. मिसबाह शेख हिचा यशाचा आलेख वाढत गेला आहे.

शेख यांची ओळख भविष्यात महाराष्ट्रात नाही तर देशात ओळख निर्माण होईल,हा खऱ्या अर्थाने जामखेड चा अभिमान आहे.तसेच संस्थेच्या ल.ना.होशिंग विद्यालयाचा आहे.असे गौरवोद्गार प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी काढले.

यावेळी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन चे सचिव डॉ सादेख पठाण इंजिनिअर,आरिफभाई शेख यांनी डॉ.मिसबाह शेख यांच्या यशाबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचाल शुभेच्छा दिल्या.डॉ.मिसबाह शेख यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुगळे,सचिव अरुण चिंतामणी,सह सेक्रेटरी डॉ.सुनील कटारिया व संस्थेचे संचालक मंडळ तसेच माजी सचिव शशिकांत देशमुख,माजी खजिनदार राजेश मोरे यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे, कला शिक्षक राऊत मुकुंद, विशाल पोले,कैलास वराट, हनुमंत वराट,राघवेंद्र धनलगडे,उमाकांत कुलकर्णी, आदित्य देशमुख,साई भोसले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल देडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुप्रिया घायतडक यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here