“माझी शेती माझा सातबारा” मीच नोंदवणार माझा सातबारा साकत मध्ये ई – पीक नोंदणीस सुरूवात

0
581
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
  माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा सातबारा या योजनेची सुरूवात साकत मध्ये तलाठी, पोलीस पाटील, मुख्याध्यापक व ग्रामस्थ याच्या उपस्थित साकत मध्ये सुरूवात झाली यावेळी तलाठी यांनी ई – पीक नोंदणीबद्दल माहिती दिली प्रत्यक्ष शेतात जाऊन ई- पीक पाहणी नोंदणीस सुरूवात केली.
१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शेतकरी खातेदारांची ॲपवर प्रत्यक्ष नोंदणी व खरीप हंगामातील पिकांची माहिती फोटोसह अपलोड करावयाची आहे. सर्व शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर जाऊन डाउनलोड करा स्वतः शेतकर्‍यांनी आपल्या पीकांची माहिती पीक पेरा स्वतः नोंदणी करावी असे आवाहन साकतचे कामगार तलाठी सचिन खेत्रे यांनी शेतकऱ्यांना केले.
       महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे अॅप विकसित केले आहे माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा सातबारा प्रत्येक शेतकऱ्याने हे अॅप मोबाईल मधे विकसित करून आपापल्या पीकांची नोंदणी करावी. यामधे काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर 02025712712 या टोल फ्री क्रमांकावर चोवीस तास संपर्क करून मदत घेऊ शकता.
ई-पीक पाहणीचे अनेक फायदे असून, प्रामुख्याने प्रकल्पातील माहिती ही शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जसे ठिंबक सिंचन, तुषार सिंचन योजनांचे लाभ खातेदारांना अचूकरीत्या देणे सहज शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदारनिहाय पीककर्ज अथवा पीकविमा योजना भरणे किंवा पीक नुकसानभरपाई अदा करणे शक्य होणार आहे. तसेच पीकनिहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे. यासोबतच या ॲपद्वारे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होऊ शकणार आहे.  १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर पीक नोंदणी करावयाची आहे.
      माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीकपेरा शेतकरी सक्षमीकरणाच्या क्रांतीचे साक्षीदार होऊन सहभागी होऊन आपण ई-पीक पाहणीची नोंदणी करावी मोबाईल वर ई-पीक पाहणी अॅप डाउनलोड करावे, अॅप मध्ये नोंदणी करा पिकांचा फोटो काढून अपलोड करा त्यानंतर मिळवा ७/१२ वर खातेनिहाय पिकांची नोंदणी करा तेव्हा शेतकरी बांधवांनी ई – पीक पाहणी अॅप आता आपली पीक पाहणी आपणच नोंदवणार
    साकत मध्ये कामगार तलाठी सचिन खेत्रे, पोलीस पाटील महादेव वराट, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, शेतकरी ज्ञानदेव मुरुमकर, आश्रू सरोदे यांना शेतात जाऊन माहिती देत ई- पीक नोंदणी केली. सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी असे आवाहन तलाठी सचिन खेत्रे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here