जामखेडमध्ये गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून मारहाण व गाड्यांची तोडफोड, सहा जणांवर गुन्हा दाखल
जामखेड मध्ये रस्त्यावरून जात असताना दुचाकी गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून फीर्यादी सह दोघांना आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली. यावेळी फीर्यादी सह त्याच्या मित्रांनी घाबरुन दुचाकी गाड्या जाग्यावरच टाकुन पळुन गेले. यानंतर आरोपींनी त्या ठिकाणी असलेल्या फीर्यादीच्या गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी एकुण सहा जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फीर्यादी प्रसाद दिनकर राजगुरू वय 23 वर्षे रा. सुतार गल्ली, हा त्याच्या मित्रांसह मंगळवार दि 6 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीड कॉर्नर या ठिकाणाहुन दुचाकीवर जात होते. यावेळी फीर्यादी प्रसाद राजगुरू याने गाडीचा हॉर्न वाजवला या कारणावरून
आरोपी सार्थक बळीराम राळेभात, पृथ्वीराज पवार, (पुर्ण नाव माहित नाही) शिवम कोल्हे, (पुर्ण नाव माहित नाही), महेश भगवान आजबे, साई प्रदिप जाधव व यश पवार (पुर्ण नाव माहित नाही) यांनी फीर्यादी व त्याच्या मित्रांची गाडी आडवली व फीर्यादीस म्हणाले की तुम्ही आमच्या पानटपरी समोर हॉर्न का वाजवला असे म्हणुन त्यांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी पुथ्वीराज पवार याने पानशॉप मधुन कोयता घेऊन आला त्यामुळे फीर्यादी व त्याचा मित्र घाबरुन आपल्या दुचाकी जाग्यावरच सोडुन पळुन गेले. यानंतर फीर्यादी ची मोटारकार क्रमांक एम एच 16 डी. ई. 0826 व त्याचा मित्र शाम अंकुश राजगुरू याची मोटारसायकल क्रमांक एम एच 16 सी. डब्ल्यू. 8882 या दोन मोटारसायकलची कोयत्या सारख्या हत्याराने तोडफोड केली.
याप्रकरणी फीर्यादी प्रसाद दिनकर राजगुरू रा. सुतारगल्ली याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा जणांनवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेऊन नंतर जामिनावर सोडण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ शिवाजी कदम हे करित आहेत.