आशा द व्हेज ट्रीट च्या माध्यमातून खवय्यांसाठी सुवर्णसंधी – अमित चिंतामणी पत्रकार हा समाजाचा आरसा असतो – प्रा. मधुकर राळेभात आशा द व्हेज ट्रीट तर्फे पत्रकारांचा सन्मान

0
564

जामखेड न्युज——

आशा द व्हेज ट्रीट च्या माध्यमातून खवय्यांसाठी सुवर्णसंधी – अमित चिंतामणी

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो – प्रा. मधुकर राळेभात

आशा द व्हेज ट्रीट तर्फे पत्रकारांचा सन्मान

परिसरातील खवय्यांसाठी केकेज नंतर आशा भेळ व आता आशा द व्हेज ट्रीट च्या रूपाने सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास अमित चिंतामणी यांनी व्यक्त केला.

आशा द व्हेज ट्रीट नगर रोड जामखेड येथे प्रफुल्ल सोळंकी, किरण रेडे, राजू भोगील व केदार रसाळ यांनी शुद्ध शाकाहारी हाॅटेल सुरू केले आहे. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, प्रा. मधुकर राळेभात, दिलीप गुगळे, अमित चिंतामणी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरसेवक श्रीराम डोके, सुमनताई शेळके, आश्रू शेळके, अँड प्रविण सानप, पवन राळेभात, प्रफुल्ल सोळंकी, किरण रेडे, राजू भोगील यांच्या सह सर्व पत्रकार क्ष उपस्थित होते.

यावेळी उद्योगपती दिलीप गुगळे म्हणाले की, आशा द व्हेज ट्रीट मुळे जामखेड च्या वैभवात भर पडणार आहे. नक्कीच ते भरभराटीला येणार आहे. नगर नंतर एवढे प्रशस्त हाॅटेल जामखेड शहरात सुरू झाले आहे. नक्कीच ते जामखेड करांची भूक भागवतील.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, पत्रकार व पोलीस यांचे जवळचे नाते आहे ते एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत तर नाण्याची एकच बाजू आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार काम करत असतात. पत्रकारांना मानधन मिळणे आवश्यक आहे. पत्रकारांचे काम म्हणजे
समाजकार्यच आहे. पुण्याचे काम आहे.पत्रकारांचा कायमच सन्मान व्हावा. 

यावेळी बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, जुन्या काळी गुप्तहेर, खबरे हे पत्रकारांचेच काम करत होते. पत्रकार समाजाचा आरसा असतो. पत्रकारिता छंद व समाजसेवा आहे. जामखेड मधील पत्रकार सेवा भावाने पत्रकारीता करत आहेत. पत्रकारांनी बरं लिहिण्यापेक्षा खरं लिखाण करावे. खास शाकाहारी जेवणाचे ठिकाण म्हणून लवकरच हे हाॅटेल नावारूपाला येईल. खास लूक दिले आहे. या हाॅटेल मुळे शहराचे वैभव वाढणार आहे. पत्रकारांसाठी शासनाने पेन्शन सुरू करावी

यावेळी नगराध्यक्ष प्रांजळ चिंतामणी, पवन राळेभात, पत्रकार वसंत सानप, नगरसेवक अँड प्रविण सानप यांनी शुभेच्छा दिल्या तर आभार किरण रेडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here