जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
गेल्या दिड वर्षापासून कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटरचे डॉ. रवी आरोळे आणि डॉ. शोभा आरोळे यांनी कोरोना रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर न करता मोफत उपचार केलेले कार्य कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जामखेड येथे केले. त्यांच्या हस्ते आरोळे हास्पीटलच्या पॅथ लॅब सेंटरचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डॉ. रवी आरोळे आणि डाॅ. शोभा आरोळे यांनी पालकमंत्र्यांना आरोळे हास्पीटलमधे कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली.
यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी उपस्थित होते.
जामखेड शेजारच्या अनेक जिल्ह्यातील कोरोना रूग्णांना आरोळे कोविड सेंटरचा आधार मिळाला आतापर्यंत हजारो रूग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तेही अगदी मोफत यामुळेच आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे व डॉ शोभा आरोळे यांचा गौरव करण्यात आला.
यानंतर कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली






