जामखेड करांचा विश्वास सार्थ ठरविणार – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार संपन्न

0
389

जामखेड न्युज——-

जामखेड करांचा विश्वास सार्थ ठरविणार – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार संपन्न

 

जामखेड करांनी आमच्या वर विश्वास दाखवत जो मतदानरूपी आशिर्वाद माझ्या सह नगरसेवकांना दिला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी व्यक्त केला.

जामखेड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने आज नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी सह नगरसेवक पोपट राळेभात, विकी घायतडक, मनोज कुलकर्णी, संतोष गव्हाळे, सागर टकले, अमित चिंतामणी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनिल लोहकरे, अमित भंडारी, दीपक ढोले, संतोष निमोणकर, पराग शिंदे, पत्रकार नासिर पठाण, दत्ता चव्हाण, आनंद गांधी, अमोल चिंतामणी, राम अंदुरे, सागर व्यवहारे, संजय शिंगवी, कुंडल औचरे, अमोल चौरे, रवींद्र गादिया, मदन कुलथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देशमुख यांनी केले तर आभार अमोल चिंतामणी यांनी मानले या कार्यक्रमात महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना तुम्ही टाकलेला विश्वास ही जबाबदारी समजून प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणार जामखेड शहराचा विकास करत तुमचा विश्वास सार्थ ठरविणार सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहर विकासाबाबत प्रगतीपथावर नेणार असे सांगितले.

यावेळी बोलताना नगरसेवक पोपट (नाना) राळेभात व मनोज कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रभाग चार हा विकासाबाबत मुंबई चा नरीमन पाँइट समजला जातो. तसेच सर्व जनतेचे आभार मानले व विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. 

यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले की. संघर्ष मित्रमंडळ हे सामाजिक उपक्रम राबवणारे मंडळ शहरात ख्याती आहे. मी नगरसेवक असताना केलेल्या विकास कामाच्या बळावर भाजपाने पुन्हा विश्वास टाकला व नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड साठी कायद्यात बदल करत एकाच व्यक्तीला नगरसेवक व नगराध्यक्ष दुहेरी पद सांभाळता येईल असा कायद्यात बदल केला.

नगरसेवक असतात दहा वर्षांत सर्व जाती धर्माच्या समाजाला बरोबर घेत एकता साधत विकास केला म्हणून तर लोक या प्रभागाला मुंबई चा नरीमन पाँइट म्हणतात. तुम्ही मतदान रूपी दिलेला आशिर्वाद कायम लक्षात ठेवत विकासाबाबत जामखेड ची आगळीवेगळी ओळख निर्माण करू असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here