कै. हनुमंत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांचे किर्तन
विविध मान्यवरांकडून हनुमंत पाटील यांच्या कार्याचा उजाळा
साकतचे माजी सरपंच कै. हनुमंत साहेबराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांनी किर्तनाच्या माध्यमातून तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील यांच्या आठवणीला उजाळा दिला. सद्गुण हाच देव आहे. दुर्गुणाने कोणीही मोठा होत नाही. हनुमंत पाटील सद्गुणी होते. त्यांचा उद्देश चांगला होता. असे प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले.
साकत गावचे माजी सरपंच कै. हनुमंत साहेबराव पाटील मुरूमकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी साकत येथे श्रद्धा व भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास ग्रामस्थ, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांचे अमृततुल्य कीर्तन झाले. कीर्तनातून सामाजिक एकोपा, सदाचार, कर्तव्यभावना व जीवनमूल्यांचा संदेश देण्यात आला. कीर्तनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
कै. हनुमंत पाटील मुरूमकर यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज तसेच सार्वजनिक सुविधांच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला. पुण्यस्मरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमासाठी प्रा. मधुकर राळेभात, दत्ता वारे, अजय काशिद, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, शहाजी राळेभात, माजी सभापती संजय वराट, रमेश आजबे, मंगेश आजबे, महेश निमोणकर, सुर्यकांत मोरे, पांडुरंग भोसले, आप्पासाहेब मुरूमकर, शरद शिंदे, सुरेश वराट, प्रा. अरूण वराट, शहादेव वराट, काकासाहेब गर्जे, आण्णासाहेब ढवळे, राजाभाऊ वराट, प्रशांत राळेभात,निखील घायतडक,भीमराव मुरूमकर, कैलास वराट, कांतीलाल वराट, बापुसाहेब कार्ले, कल्याण तांबे, डॉ. सुहास सुर्यवंशी, नितीन ससाणे
तसेच कुटुंबीय श्री. सर्जेराव साहेबराव पाटील, सरपंच मनिषा पाटील, पत्नी धनश्री पाटील, मुले ऋषिकेश हनुमंत पाटील व अभिषेक हनुमंत पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळी, विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.