सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच भीमराव कापसे यांचा आदर्श सामाजिक उपक्रम
प्रदीपकुमार महादेव बांगर विद्यालयास दहा ब्रास ब्लॉक भेट
तालुक्यातील मोहा गावचे सरपंच भीमराव कापसे सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. विद्यालयाची अडचण ओळखून पडवीमध्ये बसण्यासाठी ब्लॉक भेट दिले आहेत. या सामाजिक उपक्रमाबद्दल सरपंच भीमराव कापसे यांचे कौतुक होत आहे.
विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सरपंच भीमराव कापसे यांनी मोहा येथीलप्रदीपकुमार महादेव बांगर विद्यालयास दहा ब्रास ब्लॉक भेट दिले आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांची बसण्याची सोय होणार आहे.
मोहा येथील प्रदीपकुमार महादेव बांगर विद्यालयात पडवी मध्ये बसण्यासाठी दहा ब्रास ब्लॉक भेट देत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोय करत आदर्श उपक्रम राबविला आहे. यानिमित्त संस्थेच्या व शाळेच्या वतीने सरपंच भीमराव कापसे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी देविचंद डोंगरे, प्राचार्य आप्पा शिरसाठ सह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मोहा गावचे सरपंच श्री भीमराव कापसे यांचे तर्फे प्रदीप कुमार महादेव बांगर विद्यालय मोहा या विद्यालयास पडवीमध्ये बसवण्यासाठी दहा ब्रास ब्लॉक भेट आज दिनांक एक जानेवारी 2026 रोजी जामखेड कर्जत चे लाडके नेते आणि विधान परिषदेचे आदरणीय सभापती प्राध्यापक रामजी शंकर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या समाज उपयोगी काम करण्याच्या आवाहनाला साथ देऊन आदरणीय सरांचे धडाडीचे शिलेदार आणि मोहा गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय भीमरावजी कापसे यांच्यातर्फे आज प्रदीप कुमार महादेव बांगर विद्यालय व श्री देवीचंद वामनराव डोंगरे उच्च माध्यमिक विद्यालय मोहा या विद्यालयास पडवी मध्ये बसवण्यासाठी दहा ब्रास ब्लॉक भेट देण्यात आले आहेत.
विद्यालयाच्या स्कूल कमिटी, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाची माननीय अध्यक्ष ,माननीय सचिव, माननीय उपाध्यक्ष, माननीय खजिनदार ,व सर्व संचालक मंडळातर्फे त्यांच्यावर या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.