पदभार स्विकारताच नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी अँक्शन मोडवर नागेश्वर मंदिर घाट व नदी स्वच्छता मोहीम हाती

0
1416

जामखेड न्युज——

पदभार स्विकारताच नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी अँक्शन मोडवर

नागेश्वर मंदिर घाट व नदी स्वच्छता मोहीम हाती

सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आज त्याच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पदाचा पदभार स्विकारताच प्रांजल चिंतामणी यांनी नागेश्वर मंदिर व घाट मार्ग बाभळीमुक्त करण्याचा सूचना देत धाकटी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. त्यामुळे पदभार स्विकारताच त्या कामाबाबत अँक्शन मोडवर आल्याने जामखेड करांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागेश्वर मंदिर घाट व नदी स्वच्छता मोहीम अभियानाची पाहणी करताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, गटनेते तात्याराम पोकळे सह सर्व नगरसेवक हजर होते.

संपूर्ण राज्यात चर्चेत असणारी जामखेड नगरपरिषद निवडणूकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले. नगराध्यक्षा पदी 3682 मतांनी विजय मिळवला. तसेच पंधरा नगरसेवक निवडून आले. आज सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला व लगेच कामाला सुरुवात केली. जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर मंदिर घाट परिसर धाकटी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली. याचे कौतुक होत आहे.

 

भाजपाने पंधरा नगरसेवक व नगराध्यक्षा असे घवघवीत यश संपादन केले. गटनेते पदाची जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी केल्याबरोबर लगेच जिल्हाधिकारी यांना रखडलेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग बाबत लक्ष घालून काम पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागास सूचना द्याव्यात असे पत्र दिले.

आज पदभार स्विकारताच नागेश्वर मंदिर घाट व नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली या कामाचे कौतुक होत आहे. एक विकासाचे व्हिजन, शांत संयमी तसेच भाजपाचे व सभापती प्रा राम शिंदे यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here