सभापती प्रा राम शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त जनता व कार्यकर्त्यांना खास आवाहन
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. रामशिंदे यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी असून, या निमित्ताने त्यांनी समाजाला एकवेगळा, प्रेरणादायी संदेश दिला आहे. वाढदिवस साजरा करताना वैयक्तिक अभिनंदन, भेटवस्तू अथवा स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन टाळून, हा दिवस समाजोपयोगी उपक्रमांसाठी समर्पित करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा वाढदिवस १ जानेवारी रोजी आहे.“ त्या निमित्ताने मी दिवसभर, सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत, चोंडी येथील निवासस्थानी उपस्थित असणार आहे. “
तथापी, ज्यांना हा दिवस साजरा करावयाचा आहे, त्यांनी वैयक्तिक अभिनंदन, भेटवस्तू अथवा स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन न करता— वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन पुरक कार्यक्रम राबवावेत,शैक्षणिक उपक्रम, सामाजिक सेवाभावी कार्य,गरजू व वंचित घटकांना आवश्यक ती मदतअशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे हा दिवस साध्या व अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करावा, ही नम्र विनंती.
समाजहितासाठी केलेले कार्यच माझ्यासाठी खरी वाढदिवसाची शुभेच्छा आहे. – प्रा. राम शिंदे सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद
“समाजहितासाठी केलेले कार्यच माझ्यासाठी खरी वाढदिवसाची शुभेच्छा आहे,” असे भावनिक व अर्थपूर्ण मत व्यक्त करत, प्रा. राम शिंदे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने आणि समाजाच्या हितासाठी साजरा करण्याचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
राजकारणात उच्च पदावर असतानाही साधेपणा, सामाजिक भान आणि लोकाभिमुख दृष्टिकोन जपणारे नेतृत्व म्हणून प्रा. राम शिंदे यांची ओळख आहे. त्यांच्या या आवाहनामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये समाजोपयोगी उपक्रम चळवळ राज्यात मार्गदर्शक ठरेल.