कालिका पोदार लर्न स्कूल च्या “एक शाम सितारों के साथ ” वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाने जामखेड मध्ये धमाल.

0
357

जामखेड न्युज——

कालिका पोदार लर्न स्कूल च्या “एक शाम सितारों के साथ” वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमाने जामखेड मध्ये धमाल.

जामखेड शहरातील एकमेव अशा सी.बी.एस.ई. मान्यताप्राप्त कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये यावर्षीचा वार्षिक स्नेहसंमेलन उपरोक्त शिर्षकाखाली पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाने जामखेडकर सुखावले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्रीमती विमला एम. ( आय.पी.एस.) कमांडंट एसआरपीएफ गृप -१९, कुसडगांव तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.उज्ज्वलसिंग राजपूत एपीआय खर्डा पोलिस स्टेशन जामखेड व इतर यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने दि.२४ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता शाळेच्या प्रांगणात यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाची अद्भुत सुरुवात विद्यार्थ्यांनी सांगितिक वाद्यवृद्यांच्या म्युझिकल फिस्ट या कार्यक्रमाने तर बाॅलिवुडमधील प्रसिद्ध गाण्यांवर चिमुकले पाऊल जोरदारपणे थिरकले तर मध्ये-मध्ये काही नाटिकेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने वारंवार जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात
श्रीमती विमला एम्. ( आय.पी.एस.)
यांनी कार्यक्रमाचे यशस्वी प्रक्षेपण व खासकरून विद्यार्थ्यांच्या तबला-पखावज वादनाचे कौतुक केले व सांगितिक कलेद्वारे विद्यार्थ्यांना मोबाईलपासून आपण कसे दुर ठेऊन भावी जिवन यशस्वी करता येते याबद्दल यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमासाठी आलेल्या जामखेड व परिसरातील सर्व प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी शाळेचे संस्थापक व प्राचार्य श्री कुंदन नेमाडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तसेच सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे सर्वदूर कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here