कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची – पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
217
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या ही चार पटीने वाढली आहे. त्यामुळे हीच संख्या तिसऱ्या लाटेत अधिक होणार आहे. जिल्ह्य़ात तीसरी लाट थोपवायची आसेल तर सर्वांनी काळजी घ्यावी. आमदार रोहित पवारांचे कार्य उल्लेखनीय आहे. विकासाच्या योजना राबविण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामुळे
कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा १४ आॅगस्ट रोजी जामखेड तालुका दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याची सुरुवात खर्डा येथील सहा कोटी रुपये खर्च करून तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या भुमीपुजनाने झाली. यानंतर दुपारी जामखेड येथील आरोळे हाॅस्पिटल येथे कॅथॉलिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच  ग्रामीण रुग्णालय येथे आॅक्सीजन प्लॅन्ट व आॅक्सिजन बेड लोकार्पण सोहळा व शेवटी कर्जत जामखेड मधिल कोरोना रुग्णांच्या परीस्थिती बाबत जामखेड येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामटेके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सोनाली बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ, आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पंचायत समितीच्या सभापती राजश्री सुर्यकांत मोरे, कर्जत चे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात,  जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, सुर्यकांत मोरे, उपस्थितीत होते.
                     ADVERTISEMENT
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, कोरोना काळात कर्जत जामखेड साठी सर्व प्रथम आरोग्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. आत्तापर्यंन्त बारा हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असुन ते बरे झाले आहेत. दोन्ही तालुक्यात अतिरिक्त ९ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असेही ते म्हणाले.
या नंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी माहीती देताना सांगितले की तिसरी लाट सुरू झाली आहे मागिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या त्या मुळे पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. सध्या रूण बरे होण्याचे प्रमाण ९७% आहे. उद्या पासून जिल्ह्यातील निर्बध शिथील झाले आसले तरी पुढील दोन महीने सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान कोविड रुग्णांची मोफत सेवा केली त्यामुळे आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे व त्यांच्या भगीनी शोभाताई आरोळे यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here