सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन म्हणजेविद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श शिक्षणकेंद्र – सभापती प्रा. राम शिंदे
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन अंतर्गत साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज, सनराईज् इंग्लिश स्कूल तसेच स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव या सर्व घटक शाळांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक उत्सव–2025 दि. 22 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांनी बोलताना,“सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन हे विद्यार्थ्यांना घडवणारे व त्यांना विविध क्षेत्रांत यशस्वी करिअरकडे नेणारे आदर्श शिक्षणकेंद्र आहे,” असे गौरवोद्गार काढले.या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थान सनराईज् शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी राजेंद्र पवार, मधुकर आबा राळेभात, डॉ. भगवानराव मुरूमकर, शरद कार्ले, सोमनाथ पाचरणे, सतीश शिंदे, विजय पवार, राहुल बेदमुथ्था, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, जालिंदर चव्हाण, दत्ता शिंदे, राम निकम, प्रशांत शिंदे, महालिंग कोरे, यशराज भोरे, शरद जगताप, डॉ. महेश गोलेकर, प्रा. दादा मोहिते, प्रा. विनोद बहिर यांच्यासह शिक्षकवृंद, पालक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले की, सनराईज् शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज नोकरी, व्यवसाय, पोलीस व लष्कर भरतीसह विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करत आहेत. या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे, सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड–भोरे, संचालक प्रा. तेजस भोरे तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांना जाते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी लष्कर, पोलीस भरती व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा माननीय प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते व सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः ‘इंदुरीकर महाराज ड्रामा’ सादरीकरणाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत ‘वन्स मोअर’ची जोरदार मागणी झाली.
कार्यक्रमाचे प्रभावी निवेदक निकम महाराज यांनी केले. समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.शिस्त, गुणवत्ता व संस्कारांचा त्रिवेणी संगम असलेले हे स्नेहसंमेलन उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले.