दैवदैठण येथील पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद, महावितरण चा हलगर्जीपणा चार दिवसांत ट्रान्सफार दुरूस्ती न केल्यास ग्रामस्थांसह उपोषण करणार – सरपंच अनिल भोरे

0
574

जामखेड न्युज——

दैवदैठण येथील पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद, महावितरण चा हलगर्जीपणा

चार दिवसांत ट्रान्सफार दुरूस्ती न केल्यास ग्रामस्थांसह उपोषण करणार – सरपंच अनिल भोरे

जामखेड तालुक्यातील दैवदैठण येथील ग्रामस्थांना महावितरण च्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद आहे यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वारंवार मागणी करूनही महावितरण चे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.

देवदैठण पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद असून ग्रामस्थाला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण विभागाला ग्रामपंचायत ने पत्र दिले आहे. ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती करण्यासाठी तसेच आमदार खासदार यांच्या आदेशालाही महावितरण कडून केराची टोपली दाखवली जात आहे.

पत्र ग्रामपंचायत देवदैठण व सांगण्यावरून डीपी दिली नाही लवकर डीपी येत्या चार दिवसांत ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती केला नाही तर सर्व ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचे सरपंच अनिल भोरे यांनी सांगितले.

महावितरण चे कर्मचारी वायरमन यांच्या हलगर्जीपणा मुळे मागे ऐन दिवाळीत गाव अंधारात होते. आताही पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. विहिरीत पाणी असुनही गावाला मिळत नाही. महावितरण चे वायरमन यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना अडचणी चा सामना करावा लागत आहे.

येत्या चार दिवसांत जर ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती झाला नाही. गावाला पाणी मिळाले नाही तर संपूर्ण ग्रामस्थांना घेऊन महावितरण कार्यालय जामखेड येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच अनआहेभोरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here