जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी सरासरी 75 टक्के मतदान सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

0
642

जामखेड न्युज——-

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी सरासरी 75 टक्के मतदान

सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

 

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या मतदान वेळ संपली तरी काही ठिकाणी रांगा होत्या.
यामुळे अधिकृत आकडेवारी मिळण्यास उशीर लागणार आहे तरी सरासरी 75 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ प्रकार वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एका मतदान केंद्रावर 97 वर्षाच्या आजी लक्ष्मी क्षिरसागर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मशीन मध्ये बिघाड च्या तक्रारी येत होत्या. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान वेळ संपली तरीही काही ठिकाणी रांगा होत्या.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत एकुण मतदान 33161 आहे यात पुरुष 16749 तर स्त्री 16413 असे आहेत दुपारी साडेतीन पर्यंत एकुण मतदान 19497 झाले यात पुरुष 9674 तर स्त्री 9823 असे एकूण 58.79 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाच पर्यंत सरासरी 75 टक्के मतदान झाले.

सभापती प्रा राम शिंदे व रोहित पवार तळ ठोकून जामखेड मध्ये होते पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त होता. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी पंचरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पॅनल आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण पॅनल नाही काही ठिकाणी अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले आहेत.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी
आरोप–प्रत्यारोप

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर तीव्र शब्दात टीका केली आहे. रोहित पवारांना त्यांचा पराभव जवळ येताना दिसतोय, म्हणूनच ते पायाखालची वाळू सरकली की बेछूट आरोप करू लागले आहेत.”


याला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, जामखेडच्या राजकीय मैदानात गुंडशाही विरुद्ध सामान्य नागरिक अशी लढत आहे. याचबरोबर जामखेडमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 5 हजार रुपयांचे वाटप केल्याचा आरोपही करण्यात आला एवढंचं नव्हे तर विकास कामांबाबतही सरकारवर थेट टीका त्यांनी केली आहे. “सरकारने आमचा विकास निधी आडवला. राम शिंदे पडून रडतात… मागील 10 वर्षे मंत्री व सभापती होते, तेव्हा कोणती कामं केली? दिवे नाही लावले, तर आता काय लावणार?” असा सवाल रोहित पवारांनी करत शिंदेवर त्यांनी टीका केली आहे.

रात्री उशिरा पर्यंत आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती तरी सरासरी 75 टक्के मतदान झाले असेल.

चौकट
दोन दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील गल्लोगल्ली रात्री उशिरा पर्यंत लक्ष्मी दर्शन दिसून येत होते. दुचाकी चार चाकी गाड्या रात्रभर इकडून तिकडे फिरत होत्या यामुळे कामाचा विजय होणार कि लक्ष्मी पावणार हिच चर्चा शहरात रंगली आहे.

चौकट
क्राँस व्होटिंग चा उमेदवारांना धोका?
नगरपरिषद निवडणूकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदारांना यावेळी तीन मतदान करायचे होते. नगराध्यक्ष पदासाठी एक व दोन नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक मत असे तीन मते टाकावी लागणार होती. परंतु सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत क्राँस व्होटिंग सुरू होती याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा हे मतमोजणी दिवशी स्पष्ट होईल.

चौकट
आज मतदान प्रक्रिया पार पडली पण प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब या दोन जागेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तो पर्यंत मतमोजणी होणार नाही त्यामुळे २१ डिसेंबर पर्यंत सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here