जामखेड नगरपरिषद मध्ये दुपारी साडेतीन पर्यंत 58.79 टक्के मतदान सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार तळ ठोकून

0
462

जामखेड न्युज——-

जामखेड नगरपरिषद मध्ये दुपारी साडेतीन पर्यंत 58.79 टक्के मतदान

सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार तळ ठोकून

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता किरकोळ प्रकार वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी 3.30 पर्यंत 58.79 टक्के मतदान झाले होते. साडेपाच पर्यंत 75 ते 80 टक्के मतदान होईल अशी शक्यता आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत एकुण मतदान 33161 आहे यात पुरुष 16749 तर स्त्री 16413 असे आहेत दुपारी साडेतीन पर्यंत एकुण मतदान 19497 झाले यात पुरुष 9674 तर स्त्री 9823 असे एकूण 58.79 टक्के मतदान झाले आहे.

सभापती प्रा राम शिंदे व रोहित पवार तळ ठोकून जामखेड मध्ये आहेत जिथे एखादी तक्रार किंवा तणाव झाला किंवा कार्यकर्ते यांनी बोलावले तर ते लगेच दोघेही जातात. सर्व मतदार केंद्रावर जाऊन त्यांनी आढावा घेतला आहे. पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त आहे.

 

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी पंचरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पॅनल आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण पॅनल नाही काही ठिकाणी अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले आहेत.

विधानपरिषद सभापती राम शिंदेंची रोहित पवारांवर जोरदार टीका; “पराभव दिसत असल्याने बेछूट आरोप” जामखेड नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे अशातचं जामखेड मध्ये सुरू असलेल्या राजकीय आरोप–प्रत्यारोपांना आणखी धार देत विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर तीव्र शब्दात टीका केली आहे.

जामखेडच्या राजकीय मैदानात गुंडशाही विरुद्ध सामान्य नागरिक अशी लढत होत आहे अशी रोहित पवारांनी केली राम शिंदेवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here