जामखेड नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रांजल अमित चिंतामणी या सक्षम नगराध्यक्षा असतील
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील शहर विकासाच्या योजनांचा जामखेड शहरासाठी योग्य प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी जामखेड नगरपरिषदेवर कमळाचा झेंडा फडकवा पुढचे पाच वर्षे तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी असेल. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे आमदार सुरेश धस, प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांची भाषणे झाली. तर यावेळी आ. योगेश टिळेकर, दत्तात्रय वारे, अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, अजय काशीद, सोमनाथ राळेभात यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत राळेभात यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ‘मागील साठ वर्षे शहराच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. परंतू भारत देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर योजना आणल्या. स्मार्ट सिटी योजना, अमृत सिटी योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, हर घर जल योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना यां सारख्या योजना सुरू केल्या. महाराष्ट्राला शहर विकास योजनेसाठी केंद्र सरकारकडून पन्नास हजार कोटी रुपये मिळाले. भविष्यातही केंद्राकडून व राज्य शासनाचा भरपूर निधी जामखेड शहरासाठी मिळेल. प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे ते आमचे हेडमास्तर आहेत. त्यामुळे ते सांगतील तसे मला ऐकावे लागते. म्हणून राम शिंदे ज्या योजना मागतील त्या मंजूर करण्यात येतील. मी त्यांच्या मागे खंबीर पणे उभा आहे. “
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या भाषणाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कोतुक केले. ते म्हणाले आजवर अमित चिंतामणी हे नगरसेवक म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी प्रांजल चिंतामणी या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. त्यांचे भाषण मी ऐकले त्यावरून असे दिसून येते की त्यांना पदभार सांभाळण्यासाठी अमीत चिंतामणी यांचा आश्रय घेण्याची गरज पडणार नाही. त्या हे पद सांभाळायला स्वतः च सक्षम आहेत. देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद पडणार नाही. परंतु तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर आपल्या लाडक्या बहिणींना “लखपती दीदी” बनविण्याचे काम तुम्हाला करायचे आहे असे प्रांजल चिंतामणी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी यावेळी शहरातील सर्व बेघर लोकांना हक्काचे घरे, शहरातील संपूर्ण रस्ते सिमेंट कॉंक्रेट, मंजूर असलेली सुधारित पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करावी जामखेड नगरपरिषद हद्दीत ७ वाड्या वस्ती आहेत तेथील शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशा जलसंधारणाच्या योजना सुरू करण्यात याव्यात या मागण्या केल्या.
आमदार सुरेश धस आपल्या भाषणात म्हणाले सभापती हे पद खूप मोठे आहे त्यापदाचा मुख्यमंत्री देखील मान ठेवतात राम शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका होवू शकते परंतु विधानपरिषद सभापती या पदाचा एखादा अवमान करत असेल तर त्या व्यासपीठावर उपस्थित जबाबदार लोकप्रतिनिधींनी त्यांना थांबवणे गरजेचे होते.
यावेळी नगरअध्यक्षपदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी तसेच विविध प्रभागातील उमेदवार सुमन अशोक शेळके, श्रीराम आजिनाथ डोके, प्रवीण विठ्ठल सानप, कमल महादेव राळेभात, पोपट दाजीराम राळेभात, सीमा रवींद्र कुलकर्णी, विकी धर्मेंद्र घायतडक, हर्षद भाऊसाहेब काळे, लता संदीप गायकवाड, कोमल सनी सदाफुले, गुलचंद हिरामण अंधारे, नंदा प्रवीण होळकर, मोहन सिताराम पवार, शोभा दिलीप वारे, युनूस दगडू शेख, वैशाली अर्जुन म्हेत्रे, तात्याराम रोहिदास पोकळे, मीना हनुमंत धनवटे, अरीफ जमशीद सय्यद, संजय नारायण काशीद, आशाबाई बापू टकले, जया संतोष गव्हाळे व मोहन तुकाराम गडदे हे भाजप उमेदवार उपस्थित होते.