जामखेड नगरपरिषद निवडणूक हाय होल्टेज ठरत चालली आहे. राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार तळ ठोकून जामखेड शहरातील गल्लोगल्ली फिरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सुनील शेळके यांच्या प्रचार सभा झाल्या तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होणार आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी उद्या सायंकाळी सभा होणार आहे. यामुळे राज्यातील प्रमुख नेते जामखेड वर लक्ष ठेवून आहेत.
आज प्रभाग बारा मध्ये चुंभळी येथे एका पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटप करत आहेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली आणि गाडीचा पाठलाग करत दगडफेक करत गाडी फोडली असा आरोप पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी केला यामुळे जामखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लक्ष्मी दर्शन विषयी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, जामखेड मध्ये राज्याचे नेतृत्व करणारे दोन दिग्गज नेते आहेत. दोघेही जामखेडच्या विकासाऐवजी एकमेकांची जीरवाजीरवी करण्यात व्यस्त आहेत. यामुळे नीट रस्ते नाहीत. सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे. धुळच धुळ आहे. पिण्याचे पाणी आठ दिवस मिळत नाही. या सगळ्या समस्यांना दोन्ही नेते जबाबदार आहेत.
दोघांच्या भांडणात विकास खुंटला आहे. मतदारांनी घड्याळाला साथ दिली तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वच्छ सुंदर जामखेड करूसमोर मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होत आहे पण आम्ही कामाच्या बळावर निवडणूक जिंकू
जामखेड प्रशासनाविषयी बोलताना महेश निमोणकर म्हणाले की, जामखेड शहरात सध्या अनेक नवीन लोक येत आहेत. नवीन गाड्या फिरत आहेत. तेव्हा गाड्या चेक कराव्यात अशी मागणी केली.
हि निवडणूक धनशक्ती विरूद्ध जनशक्ती आहे काम करणाऱ्या ला निवडून द्या नाहीतर आज पैसे वाटणारे उद्या वसुली करणार आहेत. त्यामुळे विकास होणार नाही. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी प्रभाग सहा मध्ये जावून पाहावे काय परिस्थिती आहे ती दोन दिग्गज नेते असूनही जामखेड मुलभूत सुविधा पासून वंचित आहे. आमच्या ताब्यात सत्ता दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कायापालट करू