जामखेड न्युज——–
भाषणात विधानपरिषद सभागृहाचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्या विरोधात विशेषाधिकाराची सूचना
दोन डिसेंबर पर्यंत लिखित खुलासा करण्याची सूचना
जामखेड नगरपरिषद निवडणुक गाजणार
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर प्रचार सभा रविवार दि. २३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत हौसराव मोरे यांनी भाषणादरम्यान विधानपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व राज्याचे सर्वोच्च सभागृह मानले जाणारे विधानपरिषद सभागृहाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करुन त्यांचा व एकूणच संपूर्ण विधानमंडळाचा विशेषाधिकार भंग व अवमान केल्याची बाब उघडकीस आली असून अवमान करणाऱ्या पदाधिकाऱ्यास दोन डिसेंबर पर्यंत लिखित खुलासा करण्याची सूचना सादर करावी अशी नोटीस देण्यात आली आहे. यामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुक विशेष वळणावर आली आहे.

विशेषा धिकाराची सूचना विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय व प्रविण दरेकर यांनी
विशेषाधिकारी सूचना मांडली आहे. दिनांक २३ नोव्हेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता जामखेड येथील नगरपरिषद निवडणूकी दरम्यान श्री. सुर्यकांत हौसराव मोरे यांनी तालुका जामखेड, जि. अहिल्यानगर येथे विधानपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य,माननीय सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व राज्याचे सर्वोच्च सभागृह मानले जाणारे विधानपरिषद सभागृहाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करुन त्यांचा व एकूणच संपूर्ण विधानमंडळाचा विशेषाधिकार भंग व अवमान केल्याचे निदर्शनास आले आहे.
विधानपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, मा. सभापती, महाराष्ट्र विधान परिषदतसेच राज्याचे सर्वोच्च सभागृह मानले जाणाऱ्या विधानपरिषद सभागृहासंदर्भात श्री. सुर्यकांत मोरे यांनी पुढीलप्रमाणे आक्षेपार्ह विधाने केलीआहेत.

सन्माननीय सदस्यांबाबतची आक्षेपार्ह विधाने –
तांबड्या रंगाच्या बिल्ल्या बाल्याला कोणीही विचारत नाही आणि हिरव्या रंगाच्या बिल्ल्या बाल्याला मंत्रालयात सचिव लगेच बसा म्हणतात.”उडालेले बल्ब आपण ज्याला म्हणतो असे सगळे पुढे बसलेलेअसतात, कोणी पिक्चरमधून आलेला, कोणी नाटकातून आलेला, कोणी क्रिकेटमधून आलेला, कोणी म्हाताऱ्या माणसातून गेलेला असे सगळे उडालेले बल्ब तिथे आहेत.

महाराष्ट्र विधानपरिषदेला संपूर्ण भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत अतिशय महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे असे स्थान आहे.
असे बोलणे गौरवशाली संसदीय परंपरेला निश्चितच शोभणारे नाही.त्यामुळे सर्व सन्माननीय विधानपरिषद सदस्य, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानपरिषद सभागृहाचा अवमान व अवहेलना करणारे श्री. सूर्यकांत मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंग कारवाई प्रस्तावित करण्याची विधीमंडळात सादर केली आहे. जेणे करून भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि सभागृहाची प्रतिष्ठा सुरक्षित राहावी असे नोटीस मध्ये म्हटले आहे.








