जामखेड न्युज—–
नगरपरिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस ला पाठिंबा
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सर्वात आगोदर उमेदवारी जाहीर केलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार शेख रहीमुन्नीसा कमाल यांनी आज निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांना जाहीर पाठिंबा दिला तसे पत्रकार परिषदेत आसिफ शेख यांनी जाहीर केले.

सर्वात आगोदर आम आदमी पार्टीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला होता. पण आज शेवटच्या दिवशी माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांना पाठिंबा दिला. यावेळी बोलताना आसिफ शेख त्यांनी सांगितले की, मी विचार व विकासासोबत जाण्याचे ठरवले आहे. विकासाचे व्हिजन आमदार रोहित पवार यांच्या कडे आहे. शहरातील शासकीय आरोग्य केंद्र, व्यापारी संकुल, शासकीय इमारती, असे अनेक विकास कामे आहेत. आमदार रोहित पवार यांचे विकासाचे काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचे ठरवले.

आज शहाजी राळेभात यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, शहाजी राळेभात यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहाजी राळेभात म्हणाले की, आम्ही आसिफ शेख यांच्या पाठिंब्याचे स्वागत करतो. जामखेड शहराच्या विकासकामासाठी ते बरोबर आले आहेत. आमदार रोहित पवार यांचे जामखेड शहर भयमुक्त व सुंदर करण्याचे आहे. आमचे सर्व उमेदवार पाहा स्वच्छ चारित्र्य असणारे आहेत विरोधकांचे उमेदवार पाहा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.
यावेळी बोलताना मंगेश आजबे म्हणाले की,
शहराभोवती सात वाड्या वस्त्यांमध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे. त्यांना शेतकी विषयक योजना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू आमदार रोहित पवार यांच्या कडे विकासाचे व्हिजन आहे.







