शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवाराची आज अचानक माघार
भाजपाचेच काम करणार असल्याचे केले जाहीर
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत सुरज काळे यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणानात उतरल्या होत्या. भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केले होते. पण सभापती प्रा राम शिंदे व मराठा गौरव युवराज काशिद, भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी आज सुरज काळे यांची नाराजी दुर केली. यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला व भाजपाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुरज काळे यांनी सांगितले.
आज सकाळीच शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने व शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांच्या प्रयत्नाने आरती सुरज काळे या अपक्ष उमेदवार शिवसेना पुरस्कृत असतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यानंतर जोरदार हलचालींनी वेग घेतला भाजपाने सुरज काळे यांची नाराजी दूर केली यानंतर लगेच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसा राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. याच अनुषंगाने प्रभाग सात मधुन भाजपने तिकीट नाकारले तेव्हा बंडखोरी करत सुरज काळे यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. सकाळी शिवसेनेने पुरस्कृत केले आणी दुपारी अर्ज मागे घेतला.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग सात (अ) मधुन आरती सुरज काळे यांना पुरस्क्रुत उमेदवार म्हणून घोषीत केले होते. आणि अचानक परत माघार घेतली.
सुरज काळे हे भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, मराठा गौरव युवराज काशिद यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. आज सभापती प्रा राम शिंदे यांनी त्यांची नाराजी दूर केली. व सुरज काळे हे भाजपाचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.
प्रभागात दांडगा संपर्क
सुरज काळे हे गेली अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी राजमुद्रा युवा मंचाची स्थापना करुन युवकांची मोट बांधली आहे. पुर्वी शिवसेना उबाठा गटाचे ते युवा तालुका प्रमुखपदी काम केले आहे. नंतर भाजप मध्ये प्रवेश करुन नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप कडुन उमेदवारी करण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आज तो मागे घेतला व भाजपाचे काम करणार असल्याचे जाहीर केले.