भाजपाने आमचा विश्वासघात केला, आता अपक्ष लढणार, आता माघार नाही झुंज देणारच – विकी सदाफुले
गेल्या अनेक दिवसांपासून सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम होतो. तरीही माझे तिकीट नाकारून ज्यांनी कालपर्यंत विरोधात काम केले त्यांना शिंदे साहेबांनी तिकीट दिले आहे. मला तिकीट मिळणार नाही असे लक्षात येताच मी तयारी करून शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळवली व एक अपक्ष उमेदवारी अर्ज भरला माझा अपक्ष अर्ज मंजूर होतो व शिवसेनेचा एबी फार्म भरलेला नामंजूर होतो हे कसे शिंदे साहेबांनी माझ्या वर अन्याय केला आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून आता माघार नाही अपक्ष लढणारच असा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी घेतला.
ज्यांनी आमचा विश्वास घात केला त्यांना आम्ही जागा दाखवू शहरात 4800 मतदान दलित समाजाचे मतदान आहे यापैकी ऐंशी टक्के समाज आमच्या बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात आमची ताकद आहे. तिकीट नाकारले म्हणून आम्ही विरोधात मतदान करणार आहोत. आमची ताकद दाखवून देऊ आता माघार नाही झुंज देणारच असे सांगितले.
माझ्या उमेदवारी बद्दल शिंदे साहेबांनी शब्द बदलला विरोधात काम करणाऱ्यास तिकीट दिले तसेच माझा शिवसेना पक्षाचा उमेदवारी अर्ज अधिकाऱ्यांवर दबाव आणून बाद केला. अपक्ष अर्ज राहिला आहे त्यामुळे आता अपक्ष लढणार आहे पण संपूर्ण शहरात आम्ही भाजपा विरोधात रान उठवणार आहोत.
आम्ही फक्त नगरपरिषद निवडणुकीतच नाही तर येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा विरोधात काम करणार आहोत भाजपाने आमचा विश्वासघात केला आहे.
घात करणाऱ्या पक्षाचा आम्ही घात करणार आमची ताकत दाखविणारच असे बैठकीत सांगितले यावेळी शेकडो माताभगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी आंदोलने करतो मोर्चा काढतो याचाच राग मनात धरून माझे तिकीट कट केले आहे. मी प्रत्येक निवडणुकीत पक्षाला मदत केली शिंदे साहेबांना मतदान दिले मात्र मला शब्द देऊनही उमेदवारी नाकारली याबाबत सिध्दार्थनगर बैठक आयोजित केली होती. यात ते बोलत होते.